google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज : पुण्याती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक वनराज बंडू आदेंकर यांचा गोळीबारात मृत्यू, ५ राऊंड फायर आणि कोयत्याने झाला होता हल्ला.

Breaking News

ब्रेकिंग न्यूज : पुण्याती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक वनराज बंडू आदेंकर यांचा गोळीबारात मृत्यू, ५ राऊंड फायर आणि कोयत्याने झाला होता हल्ला.

ब्रेकिंग न्यूज : पुण्याती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक वनराज बंडू आदेंकर


यांचा गोळीबारात मृत्यू, ५ राऊंड फायर आणि कोयत्याने झाला होता हल्ला.

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज बंडू आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना

 रविवारी रात्री नाना पेठेत घडली. आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकारवर गोळीबार करण्यात आल्याने पुण्यात खळबळ उडाली. वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास 

नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते.त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या.

गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट पसरली. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वनराज यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर गोळीबार नंतर तातडीने वनराज यांना केईम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

Post a Comment

0 Comments