ब्रेकिंग न्यूज..व्यापारी बांधवांच्या निवेदनावर ना चर्चा, ना विचार ; सरळ केराची टोपली?
व्यापारी वर्गातून नाराजीचा सूर… नवीन मटण मार्केटच्या बांधकामासाठी सांगोला नगरपरिषदेची लगबग
सांगोला:आठवडा बाजार येथे नुकतेच भूमिपूजन झालेल्या जागेवर मटण मार्केटची नियोजित जागेबाबत बाजारातील व्यापारी व किरकोळ व्यवसायिक यांच्यामध्ये नाराजीचा
सूर असून भूमिपूजन केलेल्या जागे ऐवजी इतर ठिकाणी मटण मार्केट उभा करावे, अश्या मागणीचे निवेदन भाजीपाला व्यवसायिक व व्यापारी यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले होते.
अनेक व्यापारी व व्यवसायिक यांनी लेखी निवेदन दिले असताना , सांगोला नगरपरिषदेने मात्र ‘त्या’ निवेदनावर कसलीही चर्चा आणि बैठक न घेता बांधकामासाठी लगबग सुरू केली आहे.
व्यापारी बांधवांनी निवेदनाद्वारे आपली कैफियत मांडली असताना, त्यावर नगरपरिषदेने कसलाही विचारविनिमय न करता इमारतीचा पायाला आखणी केली आहे.
त्यामुळे सर्वसामान्य व्यापारी वर्गाच्या अर्जाची दखल न घेता, सदर अर्जास सरळ केराची टोपली दाखवली की काय ? अशी चर्चा व्यापारी वर्गातून होत आहे.
प्रस्तावित मटण मार्केट हे आठवडा बाजारातील व्यापारी व किरकोळ विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्याना गैरसोयीचे ठरणार असल्याचे म्हणणे आहे.
बाजारातील गर्दी पासून दूर जुन्या मार्केटच्या पाठीमाघे नवीन मटण मार्केट फेज- २ उभारावे, अशी मागणी व्यापारी वर्गाची आहे.
नियोजित जागेवर मार्केट बांधल्यास सांडपाणी व दुर्गंधीचा त्रास सर्वच आठवडा बाजारातील विक्रेत्यासह नागरिकांना होणार आहे. विशेष करून पावसाळ्यात याचा अधिक त्रास होणार आहे.
विकास कामे लोकांच्या सोईची झाली पाहिजेत, पण ज्या विकास कामामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होईल, अश्या विकास कामातून कोणाचे ‘स्व’हित साधण्यासाठी येवढी लगबग करून विकास कामे थोपण्याचा खटाटोप सुरू आहे, असा संताप व्यक्त केला जात आहे.
0 Comments