खळबळजनक...कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी पतसंस्थेची बनावट कागदपत्रे सादर;
बँकेचे बनावट लेटरपॅड, सही शिक्के तयार केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल; मंगळवेढा तालुक्यातील घटना
पतसंस्थेच्या नावाचा खोटा बनावट लेटरपॅड, सही शिक्के तयार करुन त्याच्यावर बनावट सह्या करुन शेतीवर असलेला
कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी बनावट कागदपत्रे तलाठ्याकडे सादर केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नंदेश्वर येथील मंगळवेढा तालुक्यातील यशोदा महिला नागरी सह पतसंस्थेचे लिपीक हणमंत भानुदास वाकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार
भारत भीमा शिंदे (रा.नंदेश्वर) यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवला आहे.
भारत शिंदे यांनी त्यांची शेतजमीन तारण गहाणखत करुन यशोदा पतसंस्थेकडून कर्ज उचलेले होते.
त्यांच्याकडून २० लाख ५५८९ रुपये येणे बाकी असतानाही त्यांनी पतसंस्थेचे बनावट लेटरपॅड,
सही शिक्के तयार करुन त्यावर सेक्रेटरीच्या बनावट सह्या करुन बोजा कमी करण्याची पत्र तलाठी यांच्याकडे दिले होते असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments