google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...तामिळनाडूच्या सराफाचे रेल्वेतून किंमती सोने लंपास, वर्षानंतर गुन्ह्याचा छडा; आरोपी सोलापूर व सांगली जिल्ह्यातील..

Breaking News

खळबळजनक...तामिळनाडूच्या सराफाचे रेल्वेतून किंमती सोने लंपास, वर्षानंतर गुन्ह्याचा छडा; आरोपी सोलापूर व सांगली जिल्ह्यातील..

खळबळजनक...तामिळनाडूच्या सराफाचे रेल्वेतून किंमती सोने लंपास, वर्षानंतर


गुन्ह्याचा छडा; आरोपी सोलापूर व सांगली जिल्ह्यातील..

सोलापूर  : कोइमतूर (तमिळनाडू) येथील सुभाष विलास जगताप सोन्याचे दागिने घेऊन त्याठिकाणी डिलिव्हरी देण्यासाठी बंगळूरहून लोकमान्य टिळक एक्सप्रेसमधून निघाले होते.

 तिरूपूर पोलिसांच्या हद्दीत सकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांच्याकडील दागिने व रोकड चोरीला गेली.सीसीटीव्ही पडताळणीत चोरटे 

सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे समजले. तमिळनाडू पोलिसांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने त्या सहा संशयितांना जेरबंद करून त्यांच्याकडून १२ लाखांची रोकड व ७० तोळे दागिने हस्तगत केले आहेत.

रेल्वेने प्रवास करताना सुभाष जगताप यांच्या ताब्यातील दागिने व रोकड सहा जणांनी लंपास केली होती. या प्रकरणी त्यांनी तिरूपूर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व त्यांच्या संशयावरून त्यांनी 

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची भेट घेतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात एक पथक नेमले. 

ते तमिळनाडू पोलिसांसमवेत सांगोला येथे जाऊन संशयितांबद्दल चौकशी केली. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून हा गुन्हा स्वप्नील तानाजी चव्हाण (रा. लोहगाव, ता. जत, सांगली), विजय कुंडलिक गंगले, अंकित सुभाष माने (दोघेही रा. सांगोला), चैतन्य विजय शिंदे, गौरव मसाजी वाघमारे 

(दोघेही रा. कान्हापुरी, ता. पंढरपूर), अमर भारत नमिगिरे (रा. जेऊरवाडी, ता. करमाळा) यांनी केल्याची बाब उघड झाली. त्यांना तपासासाठी ताब्यात घेतले. त्यांनीच चोरी केल्याची कबुली दिली.

'या' पथकाची कौतुकास्पद कामगिरी

या तपासात तमिळनाडू पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहायक फौजदार नारायण गोलेकर, पोलिस हवालदार हरिदास पांढरे, 

गणेश बांगर, सलीम बागवान, पोलिस नाईक धनराज गायकवाड यांनी मदत केली. चेन्नई पोलिस अधीक्षकांनी त्या सर्वांचे कौतुक केले आहे. 

त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देखील दिले आहे. तमिळनाडू पोलिसांनी सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांचेही आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments