खळबळजनक..पानाचे पैसे मागितल्याने सिनेस्टाइलने मारहाण
सांगोला तालुका जुनोनी येथील घटना; सोन्याची चेनही लांबविली
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : पानाचे पैसे मागतो का, म्हणून फिर्यादी व त्याच्या भावास शिवीगाळ करून तिघांनी मारहाण केली.
भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दोघांपैकी एकाच्या हातावर दारूची बाटली फोडून जखमी केले. तसेच पान टपरीच्या काचा, टेबल, फॅन फोडून गल्ल्यातील दहा हजार रुपये तसेच सोन्याची चेन नेल्याची घटना
जुनोनी (ता. सांगोला) येथे बस स्टॅन्डसमोरील दत्त पान शॉप येथे २० ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. सिनेस्टाइलने घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोपट दगडू व्हनमाने (रा. जुनोनी) यांचे बस स्टॅन्डसमोर दत्त पान शॉप आहे. २० ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा भाऊ पान टपरीमध्ये होते.
त्यांच्या ओळखीचे विठ्ठल आण्णासो शेळके (रा. काळूबाळूवाडी, ता. सांगोला), विकास व्हनमाने व आबासो व्हनमाने (दोघे रा. जुनोनी, ता. सांगोला) असे तिघे चारचाकीमधून आले
असता, त्यांनी फिर्यादीला पान मागितले. पान दिल्यानंतर पानाचे पैसे मागितलेल्या कारणाने फिर्यादी व त्याच्या भाऊ यांना शिवीगाळ करून मारहाण करू लागले.
विक्रमसिंह बीरा हाके व राजकुमार आप्पा शिंदे हे सोडवण्याकरिता आले असता, विठ्ठल शेळके यांनी विक्रमसिंह यांच्या हातावर दारूची बाटली मारून जखमी केले.
तसेच तिघांनी पान टपरीच्या काचा, टेबल, फॅन, काउंटरवर दगड मारून नुकसान केले.
रावसाहेब व्हनमाने यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन ओढून तिघे चारचाकीतून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments