खळबळजनक.. महाराष्ट्र पुन्हा हादरला ! बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही पाशवी कृत्य
कोलकात्यामध्ये डॉक्टर महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या प्रकरण देशात सर्वत्र गाजत असताना त्यानंतर महाराष्ट्र हादरला
तो बदलापूर प्रकरणाने. बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची भयंकर घटना उघडकीस आली होती.
त्यानंतर राज्यात वातावरण खूप तापले होते. हे प्रकरण ताज असताना आता कोल्हापुरातही असाच प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापुरात दहा वर्षीय चिमुरड्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती. कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
मुलीची हत्या झाल्याची माहिती आज समोर आली आहे. मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. याबाबत पोलिस यंत्रणा सतर्क झाली असू श्वान पथकाच्या सहाय्याने पुढील तपास सुरू आहे.
0 Comments