मोठी बातमी..सांगोला तालुक्यात तलाठी दि. २९ ऑगस्ट पासून बेमुदत संप..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
दि.१४/०८/२०२४ रोजी आपले सोलापूर जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या नियतकालिक बदल्या नियमबाह्य पध्दतीने झालेल्या असून सदर बदली प्रक्रियेत शासन निर्णय ९ एप्रिल २०१८ अन्वये समुपदेशनाद्वारे बदलीचे धोरण अवलंबले जावे असे स्पष्ट निर्देश असतानाही जिल्हा प्रशासनाकडून सदर शासन निर्णयाची पायमल्ली करण्यात आलेली आहे
व प्राधान्यक्रमातील १० विकल्पाप्रमाणे सेवाजेष्ठतानुसार बदली प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. सेवाजेष्ठतानुसार पात्र कर्मचारी यांचेवर अन्याय झालेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचेमध्ये नाराजी व असंतोषाची
भावना निर्माण झालेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून तलाठी संवर्गावर जाणून बुजून अन्याय केलेचे सदर बदली प्रक्रियेवरून दिसून येत आहे. आपणास नम्रपणे विनंती करणेत येते की, सदर नियमबाह्य बदली प्रक्रियेस जबाबदार
अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करून सदरची बदली प्रक्रिया रद्द करावी ही विनंती. तसेच पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर साझेस श्री. महेशकुमार सावंत यांची नेमणूक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि. १५/०३/२०२४ रोजी करण्यात आलेली असून पुनःश्च त्याच साझेवर
श्री. अमर पाटील तलाठी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. एकाच पदावर २ व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली आहे. श्री. अमर पाटील यांची पंढरपूर तालुक्यात १०-१२ वर्ष सेवा झालेली असूनही त्याच तालुक्यात त्यांची पुन्हा नेमणूक झालेली आहे.
सदरची बाब जिल्हा प्रशासनाला माहित असूनसुध्दा चुकीच्या पध्दतीने नियुक्ती केलेली आहे. तरी या बाबीचा गांभीर्याने विचार करण्यात यावा. तसेच शासन निर्णय क्र. एस-१०९५/प्र.क्र./३८६/ई-७ मंत्रालय मुंबई
दि. २१ नोव्हेंबर १९९५ अन्वये अव्वल कारकून संवर्गातील कर्मचारी क्षेत्रीय कामकाजाचा व मंडळ अधिकारी प्रस्विर्गातील कर्मचारी यांना कार्यालयीन कामकाजाचा अनुभव यावा यासाठी अदलाबदलीचे धोरण राबवून अशा कर्मचारी यांना ३ वर्षासाठी अदला-बदलीने एकदाच संधी देण्यात यावी असे
नमूद असूनही काही अव्वल कारकून यांना वारंवार मंडळ अधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे. तसेच मा. विभागीय आयुक्त पुणे विभाग यांचेकडील क्रमांक मह ४ /आस्था/१५५७/९५ विधान भवन,
पुणे दि.५/०२/१९९६ अन्वये सोलापूर जिल्ह्यासाठी अदलाबदलीने भरावायच्या पदाचे प्रमाण २७:२७ असे ठरवून दिलेले असूनही जिल्हा दरवर्षी हे प्रमाण (२७०:२७) राखले जात नसून आज रोजी प्रशासनाकडून अंदाजे ३२-३३ अव्वल कारकून हे मंडळ अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
तरी या बाबीचा विचार करून वरील परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यात यावी. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि. १९/०७/२०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या रिक्त पदाच्या ज्ञापनामध्ये अनेक रिक्त पदांचा समावेश केलेला नाही.
सदरची बाब गंभीर स्वरूपाची असून याबाबतची विचार व्हावा. तरी आपणास या निवेदनानुसार विनंती करण्यात येते की, निवेदनाचा सहानुभूतीपुर्वक विचार करून दि. २३/०८/२०२४ पर्यंत आम्हास न्याय देवून नवीन बदली प्रक्रिया राबविण्यात यावी अन्यथा
दि. २६/०८/२०२४ पासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तलाठी व तलाठी संवर्गातील मंडळ अधिकारी कामबंद आंदोलन करणार आहे. त्यामध्ये सांगोला तलाठी संघ सदर कामबंद आंदोलन मध्ये सहभागी राहील. यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. कृपया याची नोंद घ्यावी.
तसेच गेली दीड वर्षापासून तलाठी व मंडळ अधिकारी यांनी विनंती बदलीसाठी अर्ज केलेले आहेत त्याही अर्जाचा विचार करून लवकरात लवकर विनंती बदल्या करण्यात याव्यात ही विनंती. बदली प्रक्रियेमध्ये नियमबाह्य बदली झालेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांची यादी सोबत जोडत आहे.
संदर्भ :-1) समन्वय समितीमार्फत संपाची रितसर दिलेली दि.१२/०८/२०२४ ची नोटीस
2) महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे मा. अप्पर मुख्य सचिव (महसूल विभाग), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२ यांना दि.23/08/2024 रोजी दिलेले निवेदन
3) सोलापूर जिल्हा तलाठी संघ सोलापूर यांचे मा. जिल्हाधिकारी सो यांना दि.23/08/2024 रोजी दिलेले निवेदन
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवती संघटनेला संलग्न आहे. जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी मध्यवर्ती संघटनेने २९ ऑगस्ट २०२४ पासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याबाबत शासनाला दि. १२/०८/२०२४ रोजी नोटीस दिलेली आहे.
"महाराष्ट्र राज्य तलाठी संघ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असल्याने दिनांक २९ ऑगस्ट २०२४ पासून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे सर्व सभासद या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे सांगोला तलाठी संघाचे सर्व सभासद या आंदोलनात सहभागी राहतील. याची कृपया नोंद घ्यावी, ही नम्र विनंती.
अध्यक्ष
श्री हरिश्चंद्र जाधव श्री विशाल जगाते
कार्याध्यक्ष
श्री किरण बाडीवाले
उपाध्यक्ष
श्री गणेश भुजबळ श्रीमती जयश्री कल्लाळे श्री संभाजी जाधव
खजिनदार
श्री प्रसन्नजीत कांबळे श्री समाधान वगरे श्री सावाप्पा लांडगे श्री नितीन इंगोले संयटक श्री औदुंबर लिगाडे
श्री बाळासाहेब शिंदे श्री. योगेश बोदमवाड
सलामार
श्री सुनील जाधव श्री उमेश सूर्यवंशी श्री विनोद भडंगे श्री गणेश तिके श्रीमती विजया नाईक श्री उल्हास पोलके श्री प्रशांत जाधव
विशेष निमंत्रित
श्रीमती वंदना गुप्ता श्रीमती दिपा पवार श्रीमती वैशाली गायकवाड श्रीमती यशोदा पंगुडवाले श्रीमती योगिता खटाळ श्रीमती अपर्णा मोरे श्रीमती निलोफर मुजावरश्री राजेंद्र शिर्के श्री. गणेश तनमोर
0 Comments