मा. नगरसेवक शिवाजीनाना बनकर यांना सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय महात्मा फुले विशेष पुरस्कार प्रदान पुरस्कार मिळाल्याबद्दल
शिवाजीनाना बनकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे९५०३४८७८१२ )
सांगोला / :राजकीय - सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग- व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्तम कार्य केल्याबद्दल मा. आम. दीपकआबा पाटील यांचे कट्टर समर्थक व
सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवाजी नाना बनकर यांना सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय महात्मा फुले विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी तुळशीचा हार, पांढरा फेटा घालून सत्कार करण्यात आला.
श्री संत सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने श्री संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार व विशेष पुरस्कार सोहळा पुणे येथील समता भूमीवर पार पडला.
यामध्ये सांगोल्याचे माजी नगरसेवक शिवाजी नाना बनकर यांना सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय महात्मा फुले विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या निमित्ताने सांगोला येथे शिवाजीनगर यांचा जंगी सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी युवा नेते डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील, युवा नेते यशराजे साळुंखे पाटील, ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील,
माजी नगरसेवक सिद्धेश्वर (नाथामालक) जाधव, सूर्याजी खटकाळे, राजू पाटील, नंदकुमार दिघे, अनिल दिघे, बिरूदेव भजनावळे, डॉ. धनंजय पवार, सचिन पाटणे, महादेव दिघे सर, ॲड. महादेव कांबळे, रवींद्र कांबळे आदी उपस्थित
0 Comments