सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी..अनैतिक संबंधाच्या संशयातून
शिरभावी येथील फॉरेस्ट मध्ये एकाचा खून फरार आरोपीस पंढरपूर येथून घेतले ताब्यात..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला पोलीस ठाणे गु, रजि. नं. ६४८/२०२४, बी. एन. एस. कलम १०३, १४० (१), १२६ (२),३५१ (२), ३५१ (३), ३५२
नमूद गुन्हयातील आरोपी नामे सागर किसन इंगोले रा. खिलारवाडी ता. सांगोला याने त्याची पत्ची आणि मयत गजेंद्र विश्वनाथ शिंदे वयः ५५ रा. खिलारवाडी या दोघांचे अनैतीक संबंध असल्याच्या
संशयावरून दि. २७/०८/२०२४ रोजी सायंकाळी ०७:०० वा. चे. सुमारास मयताच्या मोटर सायकलला चारचाकी गाडी आडवी घालुन त्यांना गाडीत शिवीगाळी करीत
जबरदस्तीने बसवून खून करण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण केले. तेथून गादेगाव, वाखरी, कराड रोड या भागात गाडी वेगाने फिरवली व गादेगावच्या पानपट्टीतुन लोखंडी पाईप घेतला.
पुढे शिरभावी गावातील फॉरेस्टमध्ये सायंकाळी ०७:३० वाचे सुमारास आणले. त्याठिकाणी गजेंद्र विश्वनाथ शिंदे वयः५५ रा. खिलारवाडी याच्या डोकीत लोखंडी पाईपने जोराने वार करून साक्षीदार नामे गोपाळ चव्हाण,
मुबारक मुलाणी, रा. खिलाखाडी, ता. सांगोला आणि आरोपीची त्याची पत्नी यांच्या समक्ष जीवे ठार मारुन खुन केला आहे. व तेथून साक्षीदार गोपाळ चव्हाण, मुबारक मुलानी यांना शिरभावी फॉरेस्टमध्ये कॅनॉलच्या पट्टीवर निर्जन स्थळी सोडून त्याच्या पत्नीसह निघून गेला.
म्हणून मयताचा मुलगा नामे सौरभ गजेंद्र शिंदे क्यः २७, धंदाः शेती, रा. खिलारवाडी ता. सांगोला याने तकार दिल्यावरुन सांगोला पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा घडल्यापासून आरोपी नामे सागर किसन इंगोले, रा. खिलारवाडी, ता. सांगोला हा त्याचे अस्तित्व लपवून फरारी झाला होता. त्याचे बाबतीत कोणतीच उपयुक्त माहिती प्राप्त होत नव्हती.
सदर घटनेबाबत माहिती समजताच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांनी घटनास्थळी भेट देवुन
मार्गदर्शन केले व आरोपी अटकेबाबत सुचना दिल्या होत्या. आरोपी सागर किसन इंगोले, रा. खिलाखाडी, ता. सांगोला याच्या बाबत कोणतीही उपयुक्त माहिती प्राप्त गसताना, तो मोबाईल बंद करुन फरारी झाला असताना
त्याबाबत गोपनीय बामतीदारामार्फत माहिती काढून, गुन्हयाचा शिताफीने व कसोशीने तपास करून आरोपीस गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या १० तासाच्या आतमध्ये पंढरपूर येथून ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी मा. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी
अर्जुन भोसले, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पवन मोरे, सपोफौ, उवणे, पोहेकॉ. १०१९ झोळ, पोहेकों.
कोकरे, पोहेकॉ. ३५ घोडसे, पोकों. ३३५ वाघमोडे, पोकों, २७६ सावंजी, पोकों. २१२९ खराडे, पोकों. २२०६ चोरमले, पोकों. १८११ गणेश कुलकर्णी यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि पवन मोरे हे करत आहेत.
0 Comments