आ.शहाजी बापू पाटलांची उमेदवारी फिक्स ?
आघाडीत दोन चुलत भावांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच
सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे.
तर लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले अभिजित पाटील पुन्हा शरद पवार गटांकडून परतून हातात तुतारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याचसबोत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले दिपक साळुंखे हे देखील सांगोल्यातून लढण्यासाठी तुतारी हातात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजत आहे.
२०१४ साली भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार गणपत देशमुख यांनी शिवसेनेच्या शहाजीबापू पाटलांचा पराभव केला.
त्या पराभवाचा वचपा शहाजीबापू पाटलांनी 2019 च्या निवडणुकीत काढला. मात्र यावेळी शहाजीबापू पाटील आणि अनिकेत देशमुख यांच्यात अतिशय अटीतटीची लढत झाली.
शहाजीबापू पाटील अवघ्या काही हजारांनी यावेळी विजयी झाले. यातच पक्ष फुटल्यानंतर शहाजी बापू पाटलांचा काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल हा डॉयलॉग चांगलाच फ्रेमस झाला. त्यामुळे यंदा महायुतीकडून उमेदवारी मिळणार अशी शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूला महायुतीत विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष व माजी आमदार दीपक साळंखे पाटील हेही यावेळी निवडणुक लढवणारच असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे. शेतकरी काम पक्षातीलच डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख
या बंधुमध्ये तिकीटासाठी रस्सीखेच सुरू आहे. या दोन्ही नेत्यांचे भावी आमदार म्हणून पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपले राहिलेले अर्धवट शिक्षण पुर्ण करण्यासाठी बाहेर
गेलेल्या कालावधीत डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी शेकाप पक्षामध्ये आपली मजबुत फळी निर्माण केलीय.
यामुळे शेकापमध्ये उमेदवारीसाठी दोन डॉक्टर चुलत बंधूंमध्ये रस्सीखेच असणार आहे. राज्यातील युती व आघाडीमध्ये पक्षांमध्ये कशी होते, यावरच उमेदवाराची निश्चित होणार आहे.
0 Comments