google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वर्गीय आ. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या तृतीय पुण्यतिथी दिनानिमित्त मंगळवारी सांगोला येथे भजन किर्तन व पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आयोजन

Breaking News

स्वर्गीय आ. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या तृतीय पुण्यतिथी दिनानिमित्त मंगळवारी सांगोला येथे भजन किर्तन व पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आयोजन

स्वर्गीय आ. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या तृतीय पुण्यतिथी दिनानिमित्त


मंगळवारी सांगोला येथे भजन किर्तन व पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आयोजन

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- स्वर्गीय आ. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या तृतीय पुण्यतिथी दिननिमित्त सांगोला येथील शेतकरी सहकारी सूतगिरणी येथे भजन

 किर्तन व पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांनी दिली.

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार (ता. ३० जुलै) रोजी संपुर्ण तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे

मंगळवारी शेतकरी सहकारी सूतगिरणी येथे स्वर्गीय गणपतराव देशमुख समाधी स्थळ येथे भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सकाळी १० वाजता ह. भ. प. प्रकाश महाराज साठे यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी ठीक १२ वाजता समाधी स्थळावर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार आहे.

 या कार्यक्रमासाठी नागरिकांनी शेतकरी सहकारी सूतगिरणी येथील स्व. गणपतराव देशमुख समाधी स्थळ येथे उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments