google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नाझरा विद्यामंदिर मध्ये शिक्षण सप्ताहाची सांगता स्नेहभोजनाने संपन्न शालेय जीवनापासूनच उच्च ध्येय ठेवा- पोलीस निरीक्षक बी.एस.खंणदाळे

Breaking News

नाझरा विद्यामंदिर मध्ये शिक्षण सप्ताहाची सांगता स्नेहभोजनाने संपन्न शालेय जीवनापासूनच उच्च ध्येय ठेवा- पोलीस निरीक्षक बी.एस.खंणदाळे

नाझरा विद्यामंदिर मध्ये शिक्षण सप्ताहाची सांगता स्नेहभोजनाने संपन्न


शालेय जीवनापासूनच उच्च ध्येय ठेवा- पोलीस निरीक्षक बी.एस.खंणदाळे
 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- शालेय जीवनात असणाऱ्या विविध प्रसंगातून, जडणघडणीतून माणूस सक्षम होत असतो.शालेय जीवनात रुजलेले संस्कार अनंत काळपर्यंत टिकतात. 

आपण काय बनायचे हे शालेय जीवनातच ठरवत असतो. आपण जे ध्येय निश्चित करत असतो त्या ध्येयाच्या दिशेने मार्गाक्रमण करत असताना

 विविध प्रकारच्या संकटांचा सामना करत आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचतो.ध्येयापर्यंत पोहोचणे म्हणजे ध्येयाला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासारखे आहे, त्यामुळे शालेय जीवनात आपण असे ध्येय बाळगा की ते ध्येय पूर्ण होत 

असताना संपूर्ण समाज व्यवस्थेने तुम्हाला सलाम केला पाहिजे,म्हणून शालेय जीवनापासूनच ध्येयवादी बनायला शिका असे प्रतिपादन सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.एस.खंणदाळे यांनी व्यक्त केले.

नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या शिक्षण सप्ताह सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे,नाझरा गावचे सरपंच मंदाकिनी सरगर यांचे यजमान 

अण्णासो सरगर,उल्हास धायगुडे, योगेश देवकुळे पत्रकार अतुल फसाले, लक्ष्मण आलदर, दीपक खंडागळे, विष्णू खंडागळे,शिवाजी बनसोडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदाटे सर, नाझरा ग्रामपंचायतीच्या सदस्या सुमित्रा लोहार,

नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य बिभिषण माने यांनी शिक्षण सप्ताह कशा पद्धतीने साजरा केला गेला. 

प्रत्येक दिवशी कोणकोणते उपक्रम साजरे करण्यात आले,त्याचबरोबर लोकसभागातून अन्नदानाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात पालकांचा कशा पद्धतीने सहभाग नोंदवला गेला 

याबाबत विस्तृत माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे यांनी समाजात घडणाऱ्या विविध घटनांची माहिती देत मुलींसाठी व मुलांसाठी असणाऱ्या

 अत्यंत महत्त्वपूर्ण कायद्यांबद्दल माहिती दिली. समाजात जर कोणी मुद्दामहून तुम्हाला त्रास देत असेल तर पोलीस तुमच्या सदैव पाठीशी आहेत, याबाबतचा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण केला.

पोलीस आणि नागरिक यांच्यात संवाद वाढत गेला तर निश्चितपणे गुन्हेगारीला आळा बसेल तसेच पालकांनी आपल्या पाल्याबाबत कशा पद्धतीने दक्ष राहिला हवे याबाबतची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली.

त्यानंतर प्रशालेतील सहशिक्षक दिलीप सरगर यांनी सर्व अन्नदात्यांचा नामोल्लेख करत सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व अन्नदात्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सर्व पालक व विद्यार्थी शिक्षक,समाजातील ज्येष्ठ नागरिक यांच्या समवेत सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

अन्नदानाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नारायण पाटील, दिलीप सरगर,विनायक पाटील, हेमंत नलवडे,वसंत गोडसे, महालिंग पाटील,प्रा. महेश विभुते प्रा. मोहन भोसले, अतुल बनसोडे,सोमनाथ सपाटे,

गणेश रायचुरे,स्वप्निल रायचुरे,विक्रांत कदम संजय खोकले यांनी विशेष प्रयत्न केले. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांसाठी खो-खो व कबड्डीच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.

सदर सामने यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक स्वप्निल सासणे,मारुती सरगर, संभाजी सरगर, संजय चौधरी, प्रा. युवराज लोहार व दत्तात्रय जाधव यांच्यासह सर्वांनी परिश्रम घेतले.

 सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार दीपक शिंदे यांनी मांडले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले 

शिक्षण सप्ताहाची सांगता ही लोकसभागातून अन्नदान या अनुषंगाने होती.यावेळी परिसरातील 45 पालक, शिक्षणप्रेमी,सामाजिक कार्यकर्ते यांनी विविध प्रकारच्या वस्तू देऊन अन्नदान प्रक्रियेची संकल्पना यशस्वी केली. 

जवळपास 900 विद्यार्थ्यांनी व शंभर पालकांनी सदर अन्नदान प्रक्रियेचा लाभ घेतला.सर्व अन्नदात्यांबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments