मंत्रालयीन प्रशासकीय कामात माहीर ! शाहरुख मुलाणी नाझरे जि.प. च्या मैदानात ताकदीने उतरणार ; असे आहे आता पुढील नियोजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला. (प्रतिनिधी) – तब्बल 13 वर्षांपासून मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजात माहिर असलेले आणि विकास कामांचा चौफेर अनुभव असलेल्या
आमदार कॉम्रेड विनोद निकोले स्वीय सहाय्यक तथा माकप विधिमंडळ कार्यालय प्रमुख लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेतृत्व
शाहरुखभाई मुलाणी हे नाझरे जिल्हा परिषद निवडणुकीत नाझरे गटाच्या रण मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. अनेकांकडून तशी आग्रही मागणी होत असल्याने त्यांनी ही तयारी दर्शवली आहे.
शाहरुख मुलाणी हे गेल्या 13 वर्षांपासून मंत्रालय विधानभवनात स्वीय सहायक म्हणून काम करीत असून त्यांना प्रशासकीय कामाचा प्रचंड मोठा अनुभव आहे.
सरकारी कामे व योजना कशी उत्तमपणे व जलद करून घेण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे.
डहाणू विधानससभेचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांचे ते स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. सांगोलातील विविध पक्षातील
नाराज लोकांकडून तसेच जनतेतूनही शाहरुख मुलाणी यांनी नाझरे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली जात आहे.
नाझरे गटाच्या विकासासाठी अनुभवी कार्य कुशल असं नेतृत्व गरजेचे आहे. त्यामुळे मुलाणी यांनी या रण मैदानात उतरावे.
आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ताकतीने उभे राहू, अशी भूमिका अनेक जण व्यक्त करत आहेत. त्यामुळे नाझरे च्या रण मैदानात उभारण्याच्या तयारीत शाहरुख मुलाणी हे असल्याचे दिसून येते.
प्रशासकीय व सामाजिक कामाची बांधिलकी कायम जोपसणारे व्यक्तिमत्व शाहरुख मुलाणी हे उच्चशिक्षित असून त्यांनी मुंबई विद्यापीठातून कला शाखेचे शिक्षण प्रवास सर्वसामान्यसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
कला शाखेचे शिक्षण पूर्ण करीत असताना शाहरुख मुलाणी यांनी माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या सोशल मीडिया टीम मध्ये काम केले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन नगरविकास मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे उप सचिव जितेंद्र भोळे यांच्या कार्यालयात काम केले.
तसेच मध्यंतरी च्या काळात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर म्हणून देखील काम त्यांनी केले आहे. तसेच, राज्यातील विविध तब्बल 21 संघटनेचे सचिव म्हणून देखील ते काम पाहत आहेत.
मुसलमान समाजातील अनुभवी आणि धडपड करणारा युवक शाहरुख मुलाणी यांनी
या काळात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात सांगोला मध्ये अनेक समाजउपयोगी कामे केली असून कोरोना लॉकडाउन काळात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे.
गेल्या 07 वर्षात स्वतःच्या मूळगावी शासननिधीच्या माध्यमातून त्यांनी गावाचा विकास घडवून आणला. विविध देशातील अभ्यासच्या माध्यमातून नव्या विकासात्मक संकल्पनाची माहिती
शाहरुख मुलाणी यांनी देशांतर्गत तसेच विविध देशातील अभ्यास दौऱ्यातून त्या त्या ठिकाणच्या विकासाचे वेगवेगळे प्रकल्प, विविध योजना याची माहिती घेतली आहे.
त्यांनी नवीननवीन गोष्टी कौशल्य अवगत केल्या आहेत. त्या माध्यमातून नाझरे जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे.
# राज्यातील 21 संघटनेच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम
गेल्या 13 वर्षांपासून मंत्रालय विधानभवन प्रशासकीय पातळीवर सतत लोकांचा संपर्क ठेऊन शाहरुख मुलाणी हे अनेक गरजूना सढळ हाताने विविध संघटनेच्या माध्यमातून मदत करत आहेत. विविध संघटनेच्या वतीने राज्यभरात अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.
# उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षणसम्राट आणि उद्योजकांच्या हस्ते झाला सन्मान
कार्य कुशल असलेल्या शाहरुख मुलाणी यांच्या 21 संघटनेतील कामे आणि कामगार क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना सन 2017 चा मावळमराठा सन्मान पुरस्कार
शिक्षण सम्राट रोहिदास पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी मुंबईतील ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments