सांगोला तालुक्यात लोकअदालतीमध्ये ग्रामपंचायतकडील थकीत करधारकांकडून
27,67,024/- इतक्या थकीत कराचा भरणा -
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
तालुका विधी सेवा समिती, सांगोला व पंचायत समिती, सांगोला यांचे संयुक्त विदयमाने दिवाणी न्यायालय सांगोला येथे मा. संजय घुगे साहेब, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, सांगोला
व मा. आनंद लोकरे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती तथा सचिव, तालुका विधी सेवा समिती,
सांगोला यांचे मार्गदर्शनाखाली राष्टीय लोकअदालत 2024 चे आयोजन दिनांक 27/07/2024 रोजी करण्यात आले होते.
सदर लोकअदालत मध्ये पंचायत समिती सांगोला अंतर्गत तालुक्यातील एकूण 76 ग्रामपंचायत पैकी 71
ग्रामपंचायतकडील थकीत 4317 करधारकांना दावा दाखल पूर्व नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या.
सदर लोकअदालतमध्ये तडजोडीअंती 504 खातेदारांनी एकूण रक्काम रुपये 27,67,024/- इतक्या थकीत कराचा भरणा करुन सहकार्य केल्यामुळे लोकअदालत यशस्वी संपन्न झाले.
सदर लोकअदालत यशस्वी करणेसाठी मा. मिलींद सावंत, सहा. गट विकास अधिकारी श्री. वसंत फुले, श्री. अमोल तोडकरी, विस्तार अधिकारी (पंचायत), श्री. शरद दिक्षीत,
वरीष्ठ सहा. श्री. कमलेश सातपुते, कनिष्ठ सहा. तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक,
ग्रामपंचायत कर्मचारी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी परीश्रम घेतले
0 Comments