google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..आरक्षणाच्या भूमिकेविषयी राजकीय नेत्यांना जाब विचारा; प्रकाश आंबेडकर

Breaking News

मोठी बातमी..आरक्षणाच्या भूमिकेविषयी राजकीय नेत्यांना जाब विचारा; प्रकाश आंबेडकर

मोठी बातमी..आरक्षणाच्या भूमिकेविषयी राजकीय नेत्यांना जाब विचारा; प्रकाश आंबेडकर


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सध्या आरक्षणाविषयी राजकीय पक्षांची भूमिका अतिशय घातक आहे. 

कोणताही पक्ष ओबीसी आरक्षणाविषयी उघडपणे बोलत नाही. या राजकीय पक्षांना त्यांच्या भूमिकेविषयी आपण जाब विचारला पाहिजे. 

आजच्या परिस्थितीत राजकीय मतभेद असले तरी कोणीही सामाजिक मतभेद ठेवू नये असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा शनिवार (ता. 27) रोजी सांगोल्यात आली होती. 

यावेळी सांगोला येथे झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून सर्वच राजकीय पक्षांना धारेवर धरले. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेमुळे ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाला आहे.

ओबीसी आरक्षण प्रश्नावरून कोणताही राजकीय पक्ष ठोस भूमिका घेत नाही. परंतु या परिस्थितीचा राजकीय फायदा मात्र घेऊ पाहत आहेत.

 आरक्षणाबाबत राजकीय पक्षांची ही भूमिका घातक आहे. कोणीही उघडपणे आपली भूमिका मांडताना दिसत नाहीत.

अशा राजकीय पक्षांना, नेत्यांना आपण जाब विचारला पाहिजे. तुम्ही प्रत्येकातच राजकारणातून बघणार आहात का ?

 राजकीय फायद्यासाठी फुले, शाहू, बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांचे नाव फक्त घेता.

या महान व्यक्तींनी कधीही निर्णय घेत असताना मी कुठल्या समाजाचा आहे याचा विचार केला नाही. 

तसेच निर्णयानंतर माझा समाज विरोधात जाईल का याचा विचारही केला नाही. त्यांनी लोकहित व राज्यहित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला.

आजची राजकीय परिस्थिती अशी राहिली नाही. नेते सर्वच गोष्टी राजकारणाच्या ओळीत आणत आहेत. 

ओबीसी आरक्षण काढून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. आरक्षण आम्हाला नाही तर कोणालाच नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.

ओबीसींनी राजकीय चेहरा निर्माण करणे आज गरजेचे आहे. राजकीय मतभेद असले तरी सामाजिक मतभेद कोणी ठेवू नये. त्याचा फायदा राजकीय नेते घेत आहेत.

 यासाठी नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे असा उपदेशही प्रकाश आंबेडकर यांनी दिला. या सभेसाठी विविध संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments