google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक..नवी मुंबईत एका तरुणीची निघृण हत्या, चेहरा दगडाने ठेचला, प्राइवेट पार्टमधेही केल्या अनेक जखमा

Breaking News

धक्कादायक..नवी मुंबईत एका तरुणीची निघृण हत्या, चेहरा दगडाने ठेचला, प्राइवेट पार्टमधेही केल्या अनेक जखमा


 
धक्कादायक..नवी मुंबईत एका तरुणीची निघृण हत्या, चेहरा दगडाने ठेचला, प्राइवेट पार्टमधेही केल्या अनेक जखमा


उरणमधील यशश्री शिंदे  या 20 वर्षीय तरुणीची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. आरोपीने तिचे अवयव कापले. 

चेहऱ्याचा चेंदामेंदा केला. पनवेल रेल्वे स्टेशनजवळच्या झुडपातील तिचा मृतदेह पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

यशश्री एका कॉल सेंटरमध्ये काम करीत होती. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली. सायंकाळी साधारण साडेचारनंतर तिचा फोन बंद झाला. त्यानंतर यशश्री कोणालाच दिसली नाही.

25 जुलै रोजी यशश्री बेपत्ता झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. यादरम्यान तिचे फोन रेकॉर्ड तपासण्यात आले, त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये उरणमधील यशश्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपीविरोधात पॉक्सो अॅक्टअंतर्गत एफआयआर दाखल केली होती. 2019 मध्ये तरुणी अल्पवयीन होती. 

ती 14-15 वर्षांची होती. या प्रकरणात दाऊन शेख याला तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यानंतर बराच काळ तो तुरुंगात होता. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

कॉल रेकॉर्डमधून धक्कादायक बाबी उघड

तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी जेव्हा यशश्री बेपत्ता झाली, त्यानंतर तिचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले होते.

 कॉल रेकॉर्डमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सीडीआरमधून मिळालेल्या एका नंबरवर यशश्री बराच काळ बोलत असल्याचं दिसून आलं. या नंबरवरून यशश्रीला कॉल येत आणि जातही होते.

 नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा हा नंबर दाऊद शेख या तरुणाचा होता. काही वर्षांपूर्वी याच्याविरोधात यशश्री आणि तिच्या कुटुंबीयांनी पॉक्सो केसअंतर्गत एफआयआर दाखल केली होती. 

अशात बेपत्ता झालेल्या यशश्रीच्या तपासात पोलिसांनी दाऊदचा शोध सुरू केला. तरुणी बेपत्ता झाल्यापासून दाऊदचा फोन बंद आहे.

प्रायव्हेट भागांवरही वार...

यशश्री ही दाऊदजवळ असेल असा पोलिसांना संशय होता. पोलीस तिचा शोध घेतील त्यापूर्वीच तिची निघृणपणे हत्या करण्यात आली. 

यशश्री ज्या अवस्थेत सापडली ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

 यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक वार करण्यात आले होते. तिच्या छातीवरही अनेक ठिकाणी खूणा होत्या. सर्वात वाईट अवस्था तर तिच्या चेहऱ्याची होती. दगडाने चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात आला होता.

फॉरेन्सिक टीमला पाठवले कपडे...

यशश्रीचे कपडे फाटलेले होते. याशिवाय प्रायव्हेट पार्टवरही अनेक खूणा होत्या. त्यामुळे हत्येपूर्वी यशश्रीवर बलात्कार करण्यात आला होता,

 अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर याबाबत खुलासा होऊ शकेल.

तासन् तास दाऊदशी फोनवरून बोलायची यशश्री...

ज्या दाऊदला यशश्री आणि तिच्या कुटुंबीयांनी तुरुंगात पाठवलं होतं, त्याच्यासोबत यशश्री संपर्क का ठेवत होती, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यशश्री तासनतास त्याच्याशी फोनवरून बोलत होती.

प्रेम होतं? मग इतकी क्रूरता कुठून आली?

दाऊदच्या मनात यशश्रीबद्दल राग-चीड होता. त्याला यशश्रीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं होतं.

 यासाठी गेल्या पाच वर्षांपासून तो याचं प्लानिंग करीत होता असा पोलिसांचा अंदाज आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा यशश्रीही बोलणं सुरू केलं. आपण केलेल्या कृत्याची माफी मागितली. 

तिच्याशी मैत्री केली आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. दाऊदनेच यशश्रीची हत्या केल्याचा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. तरी पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

उरणकरांमध्ये आक्रोश...

यशश्री शिंदे या तरुणीची हत्या झाल्याचे 26 जुलै रोजी रात्री उघडकीस आले. त्यानंतर तरुणीचे नातेवाईक व जनतेमध्ये आक्रोश व्यक्त केला. 

काल उरण बाजारपेठ बंद केल्यावर संध्याकाळी उशीरा सदर तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 आज उरणमध्ये मोठ्या प्रमाणात समस्त उरणकरांकडून निषेध मोर्चेचं आयोजन केलं गेले. 

उरणमधील यशश्री शिंदेंच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांकडून आज उरणमध्ये निदर्शने नोंदवण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments