google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वझरे येथे मा. आमदार दीपक आबांच्या गाव भेट दौऱ्यात जनता दरबाराचे स्वरूप, अनेक प्रश्नांचा निपटारा

Breaking News

वझरे येथे मा. आमदार दीपक आबांच्या गाव भेट दौऱ्यात जनता दरबाराचे स्वरूप, अनेक प्रश्नांचा निपटारा

वझरे येथे मा. आमदार दीपक आबांच्या गाव भेट दौऱ्यात जनता दरबाराचे स्वरूप, अनेक प्रश्नांचा निपटारा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

नाझरे (प्रतिनिधी):- राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वझरे ता. सांगोला सांगोला गाव भेट दौऱ्यात जनता दरबार चे स्वरूप आले होते.

दिपकआबांकडून जागेवरच अनेक प्रश्नांचा निपटारा झाला असून, पवार वस्ती, कदम वस्ती, दलित वस्ती व गाव भाग येथे दिपक आबांच्या स्वागताला महिला, नागरिक, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

 असल्याने जनता दरबाराचे स्वरूप प्राप्त झाले होते.यावेळी उपस्थित महिलांनी रेशन मिळत नाही, घरकुल नाही, व अनेक समस्या आबांच्या समोर मांडल्या. 

यावेळी दिपक आबांनी सर्व महिलांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना केल्याने दिलासा मिळाला तसेच महसूल, आरोग्य, विज वितरण याबाबत ही दिपक आबांनी दिलखुलास संवाद सर्वांबरोबर साधला. 

यावेळी आरोग्य सहाय्यिका व तलाठी यांचे गावातील कामकाजाबाबत दिवस, वार ठरवा अशा सूचना दिल्या. तसेच वझरे येथे विद्युत उपकेंद्र उभारून विजेचा प्रश्न सोडवावा असे युवा नेते महेश वाघमारे यांनी सांगितले 

तर मागासवर्गीयासाठी सांस्कृतिक भवन उभे करा असे बापू वाघमारे यांनी तर आरोग्य प्रश्न सोडवणूक करा असे ज्ञानेश्वर वाघमारे यांनी तर रस्त्याचा प्रश्न सोडवा असे चंद्र रेड्डी यांनी सांगितले.

 तसेच पांडुरंग वाघमारे, प्रकाश पाटील, संजय खिलारी यांनी प्रश्न मांडले व त्या सर्व प्रश्नांची सोडवणूक होय असे दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले

.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी मदत करा व वझरे येथे विद्युत उपकेंद्र, श्री दत्त मंदिर ते वझरे रोड लाईट, घरकुल प्रश्न, रेशन कार्डावर धान्य मिळणे, अपंग योजना, सांस्कृतिक भवन व

 कै. ह भ प धोंडीराम यादव यांचे स्मारक रुपी प्रश्न सोडवण्यासाठी आपण मदत करू तसेच वझरे व सांगोला तालुक्यातील 40 हजार धान्य न मिळणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना लवकरच न्याय मिळवून देऊ

 असे आश्वासन ही दिपकआबा साळुंखे पाटील यांनी यावेळी वझरे ग्रामस्थांना दिले. त्यामुळे आनंदी वातावरण निर्माण झाले असून वझरे गाव भेट दौऱ्यात अनेक प्रश्नांचा निपटारा झाला.

यावेळी ह. भ. प. धोंडीराम यादव महाराज यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच वझरे ग्रामस्थांच्या वतीने दिपक आबांचा भव्य सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी चेअरमन भिकाजी बाबर,

 माजी प्राचार्य के. वाय. पाटील, युवा नेते सत्यजित लिगाडे सरकार, सरपंच संजय कोकरे, उपसरपंच बाबुरावजाधव, ज्ञानेश्वर शिंदे, राजाभाऊ गुजले, आबा पवार, माजी सरपंच महादेव पवार, अशोक पाटील, सचिन यादव,

 लक्ष्मण जाधव, बापू पवार, मल्हारी चव्हाण, विजय कोटी, सिद्धेश्वर पाटील, प्रा. डी. के. पाटील, गोरख शिंदे, दीपक शिंदे, प्रशांत कदम, दत्ता वाघमारे, काका वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, पांडुरंग वाघमारे, बबलू पवार, आप्पा पाटील, 

सुरेश रेड्डी, दत्ता जाधव, शरद वाघमारे, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका, अंगणवाडी शिक्षिका, आशा वर्कर, माजी सरपंच चांगुना वाघमारे पत्रकार रविराज शेटे, ग्रामस्थ, महिला, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments