खळबळजनक घटना.. माहेरी आली अन् 2 वर्षाच्या लेकीसह कृष्णा नदीत घेतली उडी सातारा जिल्ह्यातील घटना..
माहेरी आलेल्या विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीसह आत्महत्या केल्याने साताऱ्या जिल्ह्यातील वडूथमध्ये खळबळ उडाली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.
त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. विवाहितेने पुलावरून नदीपात्रात उडी घेतली.
सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याच नदीपात्रात उडी घेत महिलेने आत्महत्या केली.
वडूथ गावाच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलावरून एका विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन उडी मारून आत्महत्या केली आहे.
संचिता अक्षय साळुंखे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहिता ही वडूथ येथे आपल्या माहेरी आली होती.
या घटनेत दोन वर्षीय अक्षिताचा मृतदेह कृष्णा नदी पात्रात सापडला असून, संचिता साळुंखे यांचा मृतदेह शोधण्याचे काम सध्या सुरू आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
0 Comments