अशोक कामटे संघटनेच्यावतीने सत्येंद्र सिंह यांचा सत्कार सांगोला स्टेशन हरीत क्रांतीमधे सिंह यांचे मोठे योगदान:- नीलकंठ शिंदे सर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८२)
सांगोला (प्रतिनिधी)सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने सांगोला रेल्वे स्टेशनचे अधिक्षक सत्येंद्रसिंह यांच्या खात्यांतर्गत बदलीनिमित सत्कार करण्यात आला.
सुरुवातीस रेल्वे स्टेशन येथे स्टेशन मास्टर सत्येंद्र सिंह यांना संघटनेच्यावतीने अशोक कामटे यांची प्रतिमा, घड्याळ व आंब्याचे झाड मकरंद पाटील यांच्या हस्ते देऊन कृज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी नीलकंठ शिंदे सर यांनी अधिक्षक सत्येंद्र सिंह यांनी स्टेशनमध्ये जे आमूलाग्र बदल केले त्याबद्दल कौतुक केलें,
स्टेशन येथे मोठया प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे सांगोलकर ही गोष्ट कदापीही विसरणार नसल्याचे मत शिंदे सर यांनी व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे मकरंद पाटील,अनिल तरलाकर,बाळासाहेब टापरे, प्रकाश खडतरे, गांगाकुमार सिंह यांच्यासह स्टेशन मधील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments