सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना.. दारूच्या नशेत ३२ वर्षीय तरुणाने घेतला गळफास
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : दारू पिलेल्या ३२ वर्षीय तरुणाने नशेत नायलॉनच्या दोरीने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना शनिवार २७ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास मेडशिंगी, ता. सांगोला येथे घडली.
अजित जगन्नाथ वाळके (३२), असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत, जगन्नाथ शंकर वाळके (रा. मेडशिंगी, ता. सांगोला) यांनी खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृत अजित यास दारू पिण्याचे व्यसन असल्याने वडिलांनी त्याला सांगली येथील खाजगी रुग्णालयात दारू सोडण्यासाठी नेले होते.
त्यावेळी डॉक्टरांनी यापुढे तू दारू पिलास तर मरशील, असे सांगितले होते, तरीही मागील दोन- तीन दिवसांपूर्वी त्याने पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली.
दरम्यान, २७ जुलै रोजी घरातील सर्व जण घराजवळ काम करीत होते. हीच संधी साधून अजितने खोलीतील पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेतला.
खोलीतून मुलाचा आवाज येत नसल्यामुळे आई घरात गेल्यानंतर मुलाने नशेत गळफास घेतल्याचे समजले.
त्यास सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.
0 Comments