google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कारगिलच्या लढाई मध्ये शहीद झालेले सुरेश देशमुख यांच्या स्मारकास श्रद्धांजली वाहून विजय दिवस साजरा..

Breaking News

कारगिलच्या लढाई मध्ये शहीद झालेले सुरेश देशमुख यांच्या स्मारकास श्रद्धांजली वाहून विजय दिवस साजरा..

कारगिलच्या लढाई मध्ये शहीद झालेले  सुरेश देशमुख यांच्या स्मारकास श्रद्धांजली वाहून विजय दिवस साजरा.. 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सोलापूर जल्ह्यातील आजी माजी सैनिकासाठी विजय दिवसाचे आयोजन सांगोला तालुक्यांतील सोनद येथे करण्यात आले होते. 

कारगिलच्या लढाई मध्ये सोलापूर जिल्ह्यातून एकमेव शहीद झालेले जवान सुरेश आप्पासाहेब देशमुख यांच्या स्मारकास श्रद्धांजली वाहण्यात आली.

शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना सदैव सैनिकांचे सातत्य लाभो आणि त्यांची उणीव भरून निघावी तसेच नवीन पिढीला देशसेवेची प्रेरणा मिळावी या हेतूने 

आयोजन त्यांच्या गावी सोनंद येथे करण्यात आले होते. शहीद दिनाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून सिंहगड पब्लिक स्कूलचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित झाले होते 

सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी विजय दिवसाविषयी आणि भारतीय सेनेतील जवानाविषयी आपले विचार मांडले तसेच देश सेवा करण्यासाठी नव्या पिढीला प्रेरणा मिळावी

 या दृष्टीने शाळा स्कूल आणि आपल्या घरातूनच आपल्या मुलांना प्रेरित करावे आणि पुढील काळासाठी आपला देश बळकट करावा असे मत माजी सैनिक कल्याणकारी संस्थेचे सहसचिव उत्तम चौगुले यांनी मांडले

युवा नेते जगदीश बाबर यांनीही आपले विचार सैनिकाविषयी असणारा आदर आपल्या भाषणातून व्यक्त केला तसेच माजी सैनिक कल्याणकारी संघटना 

सांगोला यांचे अध्यक्ष आणि आपले मनोगत मनोगत व्यक्त करताना आलेले वेगवेगळे युद्धातील प्रसंग सांगितले .

 यावेळी सुभेदार एकनाथ कोळेकर, माजी सैनिक जिल्हा अधिकारी रोहिदास सपकाळे, तसेच सिंहगड पब्लिक स्कूलचे शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले,

या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी सोलापूर हून माजी सैनिक सह्यक कल्याण अधिकारी श्री रोहिदास सपताळे साहेब. राष्ट्रवादीचे नेते दीपक आबा साळुंखे पाटील  ,सांगोला माजी  सैनिक कल्याणकारी

 संघटनेचे अध्यक्ष रावसहेब साळुंखे आणि सर्व पदाधिकारी तसेच सोनंद गावचे अजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र काशीद साहेब,सचिव मुरलीधर ठोकले सर्व पदाधिकारी आणि

 सदस्य, जवळा गावचे आजी-माजी सैनिक संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य ,सदर शहीद दिनाच्या कार्यक्रमासाठी सांगोला पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

यावेळी शहीद पिता आप्पासाहेब देशमुख जगदीश बाबर सब इंस्पेक्टर काशीद  शिवसेनेचे युवा नेते सागर पाटील. सतीश काशीद ग्रामसेवक ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ

 माजी सैनिक आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे राजकीय सामाजिक नेतेमंडळी. महिलावर्ग ज्येष्ठ नागरिक , माजी सैनिक मोठ्या संख्येने श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.

 कारगिल दिवसाचे नियोजन आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था सोनंद यांचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी सदस्य यांनी शिस्तबद्ध पद्धतीने  केले होते .

Post a Comment

0 Comments