google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज ! सोलापुरात सापडला अतिविषारी घोणस

Breaking News

ब्रेकिंग न्यूज ! सोलापुरात सापडला अतिविषारी घोणस


ब्रेकिंग न्यूज ! सोलापुरात सापडला अतिविषारी घोणस

सोलापूर -विजापूर रोड, सैफुल-सोरेगाव रोड परिसरातील सुयश गुरुकुल प्रशालेच्या पाठीमागील जुन्या (बंद) पाण्याच्या हौदामद्धे सापांचे पिल्ले निदर्शनास आल्याची माहिती

 तेथील उपस्थित किरण शिंदे यांनी "निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांना फोन कॉल द्वारे कळवली. माहिती मिळताच 

सर्पमित्र रविचंद्र स्वामी व संघटनेचे सचिव सर्पमित्र अक्षय रजपूत हे घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, तेथे "भारतातील 'अतिविषारी घोणस' जातीचा सर्प व त्याची तब्ब्ल १२ पिल्ले" आढळून आले.

 त्या सर्व सर्पास सर्पमित्रांनी अत्यंत परिश्रमाणे व शिताफिने सुरक्षित रित्या पकडले. दरम्यान हा प्रकार पाहण्यासाठी तेथील रहिवासी नागरिक व प्रशालेचे कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष सर्पमित्र रविचंद्र स्वामी व सचिव सर्पमित्र अक्षय रजपूत यांनी सर्प पकडल्यानतर उपस्थितांना सापांविषयी महत्वपूर्ण माहिती दिली

 व तसेच घ्यावयाची काळजी, स्वच्छता, उपाययोजना संदर्भात मार्गदर्शन केले. उपस्थित सर्वांनी निसर्गप्रेमी सर्पमित्रांचे आभार मानले व त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आले.

Post a Comment

0 Comments