सांगोल्यात चौकाचौकांत मोकाट जनावरांचा ठिय्या मोकाट जनावरांमुळे होत आहेत अपघात; नागरिक, व्यापाऱ्यांना त्रास
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोल्यात रहदारीच्या विविध ठिकाणी मोकाट जनावरे बिनधास्त रवंथ करीत बसलेली असतात. त्यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दुचाकीस्वार व पायी चालत जाणाऱ्या नागरिकांचा जनावरांमुळे अपघात झाल्याचे समजते. याकडे नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, असा नागरिकांतून सूर येत आहे.
सांगोला शहराच्या मध्यवर्ती व रहदारीच्या भागात तसेच कोल्हापूर- सोलापूर हायवेवर मिरज रोड, वाढेगाव चौक, मंगळवेढा, पंढरपूर रोड, वासुद चौक ते कर्मवीरनगर आणि गाव भागातील
भाजी मंडई, इतकेच काय तर नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर व नेहरू चौक याठिकाणी दिवसभरात अनेक वेळा मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसलेली असतात.
दिवसभरात हीच जनावरे भुसार मालाच्या दुकानांसमोर ठेवलेल्या धान्यात, भाजी व फळ सांगोला : चौकात ठिय्या मांडून बसले
विक्रेत्यांच्या ठेल्यावरील पदार्थात तोंड घालून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान करीत असताना दिसून येतात. दरम्यान, व्यवसाय मालकाने जनावरे हाकालण्याचा प्रयत्न केल्यास ही जनावरे उधळतात.
अशावेळी रस्त्याने जाणा-येणाऱ्या सायकल, दुचाकीस्वार व पायी चालणाऱ्या नागरिकांना जनावरांचा धक्का लागून अपघात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनादेखील यापूर्वी याचा त्रास झालेल्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. आषाढी वारीदरम्यान वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या-
येणाऱ्या वारकऱ्यांनादेखील याचा त्रास सहन करावा लागला आहे. असे असतानादेखील या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
त्यामुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रशासनाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक, वाहनचालक व व्यापारी करीत आहेत.
0 Comments