सांगोला येथे झालेल्या चिंतन बैंठकीत कांबळे कुटुंचीयांना न्याय देण्याची सकल मातंग समाजाची मागणी सुनील कांबळे खून प्रकरणः
शुक्रवारी निघणार तहसिल कार्यालयावर सकल मातंग समाजाचा जन आक्रोश मोर्चा
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/प्रतिनिधीः महुद येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल कांबळे यांचा खून अतिशय निघृणपणे केला
असून त्या गावातील गावगुंडांनी कांबळे यांना मारून दहशत माजवली आहे.
या खूनाचा मुख्य सूत्रधाराचा शोध घेवून त्याला अटक करण्यात आली पाहिजे. मातंग समाजाचे सामाजिक
कार्यकर्ते सुनील कांबळे यांच्या खूनाच्या निषेधार्थ काल सांगोला येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज भवन येथे
अकरा वाजता सकल मातंग समाजाच्या व वतीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी चिंतन बैठक बोलावली होती.
यावेळी व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनीतीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
तत्पूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस व स्व सुनिल कांबळे यांच्या प्रतिमेस माजी उपनगराध्यक्षा सरस्वती रणदिवे,
स्वः सुनील कांबळे याच्या कुटु ंबियांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सकल मातंग समाजातील युवकांचा लक्षवेधी सहभाग होता. येत्या मंगळवारी सकाळी १० वाजता
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साठेनगर येथूनमहात्मा फुले चौकापासून तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
या जन आक्रोश मोर्चात तालुक्यातील मातंग समाजातील स्त्री पुरुष व युवक सहभागी होणार आहेत. तरी या जनआक्रोश मोर्चात तालुक्यातील
सर्व सकल मातंग समाजातील समाज बांधवानी सहभागी व्हावे, असे आवाहन या चिंतन बैठकीत करण्यात आले.
सदर चिंतन बैठकीत सांगोला तालुक्यातील व इतर जिल्हयातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते स्वःसुनील कांबळे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या चिंतन बैठकीत तालुक्यातील
प्रत्येक गावातील मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी सुनील कांबळे यांच्या पत्नी मुलगा,
आई, बहिण यांनी समाजातील समाज बांधवांना भावनिक साथ घालत स्वर्गीय सुनील कांबळे यांच्या
खुनातील प्रमुख सूत्रधारास अटक करावी आणि आमच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी भावनिक घातली.
स्वर्गीय सुनील कांबळे यांच्या खूनामुळे तालुक्यातील मातंग समाज पेटून उठला आहे.
अशा या मातंग समाजातील युवकाच्या हत्येने सामाजिक चळवळीतील एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सुनील कांबळे यांच्या खुनातील आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी
ही प्रमुख मागणी यावेळी या चिंतन बैठकीत बोलताना अनेक समाज बांधवांनी व्यक्त केली.
0 Comments