google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेची महापूजा संपन्न, 'या' भाग्यवान वारकरी दांपत्याला मिळाला पुजेचा मान

Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेची महापूजा संपन्न, 'या' भाग्यवान वारकरी दांपत्याला मिळाला पुजेचा मान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेची महापूजा संपन्न, 'या' भाग्यवान वारकरी दांपत्याला मिळाला पुजेचा मान


आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीत वैष्णवांचा अफाट मेळा भरलाय, अठरा लाखांच्या आसपास वारकरी भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. 

पंढरी नगरी विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. आज मध्यरात्रीपासून भाविकांनी पवित्र चंद्रभागा 

स्नानाची पर्वणी साधण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. चंद्रभागेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.

दरम्यान, आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली.  यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील,

 ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासह अनेक मंत्री-खासदार देखील या महापूजेसाठी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांसोबत यंदा नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे. 

अहिरे हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन गावचे रहिवाशी असून ते मागील 16 वर्षांपासून नियमित पंढरीची वारी करत आहेत.

 दरम्यान, आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आज लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे.

Post a Comment

0 Comments