google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...दिपकआबांच्या गावभेट दौऱ्याला जनता दरबाराचे स्वरूप ; आबांच्या गावभेट दौऱ्यात होतोय अनेक अडचणींचा निपटारा

Breaking News

मोठी बातमी...दिपकआबांच्या गावभेट दौऱ्याला जनता दरबाराचे स्वरूप ; आबांच्या गावभेट दौऱ्यात होतोय अनेक अडचणींचा निपटारा

मोठी बातमी...दिपकआबांच्या गावभेट दौऱ्याला जनता दरबाराचे स्वरूप ;


आबांच्या गावभेट दौऱ्यात होतोय अनेक अडचणींचा निपटारा 

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : तालुका प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट दौऱ्याचा झंजावात सुरू आहे.

 गावभेट दौऱ्याच्या पाचव्या आणि सहाव्या दिवशीही वाड्यावस्त्यावर दिपकआबांच्या स्वागताला जनसागर उसळला असल्याचे चित्र दिसून आले. 

गावभेट दौऱ्यात जागेवरच अडचणी सुटत असल्याने वाड्या वस्त्यांवरही आबांच्या गावभेट दौऱ्याला जनता दरबाराचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. 

शनिवार दि 20 जुलै रोजी पाचेगाव, किडबिसरी, तिप्पेहळी आणि जुनोनी या गावातील वाड्यावर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील 

यांनी परिसरातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. पाचेगाव येथील बिलेवस्ती, घोडकेमळा, गावभाग तसेच किडबिसरी येथील देवकतेवस्ती,

 टेपेवस्ती आणि गावभाग तर तिप्पेहळी येथील शिवेचीवस्ती, मधलावाडा आणि मोहितेवस्ती आणि गावभाग तसेच जुनोनी येथील बेंदवस्ती, काळूबाळुवाडी, बळवंतमळा, 

ढोले-तंडे वस्ती आणि जुनोनी गावभाग परिसरातील हजारो नागरिकांना भेटून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला.

 पाचेगाव बु. येथील महिलांनी तर आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच शेती आणि कौटुंबिक समस्या बाबत आबांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या. 

माजी आमदार दिपकआबांनी अत्यंत शांतपणे सर्व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर मार्ग काढून महिलांना दिलासा दिला.

रविवार दि २१ जुलै रोजी लोटेवाडी गावातील सातारकरवस्ती, नवी लोटेवाडी, जुनी लोटेवाडी आणि इटकी 

गावातील डोंगरे सावंत वस्ती, चव्हाण वस्ती, बुद्ध विहार, पिंटू करचे वस्ती, तसेच गावभाग इटकी या परिसरातील नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. 

वड्यावस्त्यावरील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गावभेट दौऱ्यावर असलेल्या माजी आमदार दिपकआबांच्या गावभेट दौऱ्याला असणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 

आबांचा झंजावात आणि नागरिकांचा आबांना मिळणारा प्रतिसाद याची सांगोला तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. 

 रात्री १० वाजेपर्यंत दिपकआबा लोकांसोबत

ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा वेदना जाणून

 घेण्यासाठी गावभेट दौऱ्यावर असलेले दिपकआबा रात्री १० वाजेपर्यंत लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. गाव खेड्यातील आणि वाड्या वस्त्यावरिल नागरिकांच्या रस्ते, 

पिण्याचे पाणी आणि वीज तसेच अन्य महत्त्वाचे प्रश्न दिपकआबा सोडवत असल्याचे चित्र सध्या गाव खेड्यातील नागरिकांना पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments