google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला मुस्लिम समाजाचा सकारात्मक प्रतिसाद.सांगोला बंद व मोर्चाचे नियोजन रद्द.

Breaking News

पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला मुस्लिम समाजाचा सकारात्मक प्रतिसाद.सांगोला बंद व मोर्चाचे नियोजन रद्द.

पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला मुस्लिम समाजाचा सकारात्मक प्रतिसाद.सांगोला बंद व मोर्चाचे नियोजन रद्द.


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / तालुका प्रतिनिधी गजापूर जि. कोल्हापूर येथे मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थना स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार २२ जुलै रोजी सांगोला तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने

 सांगोला शहर बंद ची हाक दिली होती तसेच सदर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आले होते.

   राज्यभरामध्ये सांगोला तालुका हा शांतता प्रिय तालुका म्हणून सर्वत्र परिचित असून सर्व तालुक्यात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व तालुक्यात सामाजिक सलोखा टिकून राहावा

 यासाठी मंगळवेढा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे  यांनी रविवार २१ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता 

सांगोला येथील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन आवाहन करण्यासाठी सांगोला पोलीस स्टेशन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती

 सदर बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना डी.वाय.एस.पी विक्रांत गायकवाड म्हणाले की आषाढी एकादशी व त्यानंतर गंभीर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे

 पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी गजापूर जि. कोल्हापूर येथील घटनेच्या अनुषंगाने मुस्लिम समाजाकडून सांगोला बंद व मोर्चाचे नियोजन रद्द करावे 

व शांततेच्या मार्गाने तहसीलदार यांना निवेदन देऊन आपले निषेध व्यक्त करावे असे आवाहन सदर बैठकीत डी वाय एस पी विक्रांत गायकवाड यांनी केले.

   पोलीस प्रशासनाच्या या आवाहनाला मुस्लिम समाजाने सकारात्मक प्रतिसाद देत सोमवार दि.२२ रोजी मुस्लिम समाजाकडून आयोजित केलेला मोर्चा व 

सांगोला बंद चे नियोजन सर्वानुमते रद्द करण्यात आले असून लोकशाही मार्गाने सांगोला तहसीलदार यांना सोमवार दि.२२ जुलै रोजी सकाळी ठीक ११ वाजता निवेदन 

देऊन पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मकपणे प्रतिसाद देत असल्याची ग्वाही यावेळी मुस्लिम धर्माचे धर्मगुरू हाजी शब्बीरभाई खतीब यांनी समाजाच्या वतीने दिली.

  पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन मुस्लिम बांधवांनी गजापूर जि. कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सांगोला बंदची दिलेली हाक व मोर्चा रद्द

 केल्याबद्दल मुस्लिम समाजाचे आभार पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी व्यक्त केले.

या बैठकीला हाजी शब्बीरभाई खतीब, शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दिन खतीब, पत्रकार मिनाज खतीब, मोहसीन खतीब, अमजद बागवान, असिफ इनामदार, शौकतभाई खतीब, 

मोहसीन पठाण, पत्रकार मोहसीन मुलाणी, फिरोजभाई खतीब, तोहीद शेख, यांच्यासह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments