google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे 31 जुलैला आयोजन

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे 31 जुलैला आयोजन

ब्रेकिंग न्यूज...बेरोजगार उमेदवारांसाठी  रोजगार मेळाव्याचे 31 जुलैला आयोजन 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सोलापूर :-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर तसेच गुरूप्रसाद स्कील

 डेव्हलपमेंट सेंटर पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 31 जुलै 2024 रोजी रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्याल पंढरपूर येथे पंडीत दीनदयाल

 उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे प्र.सहायक आयुक्त हनमंत नलावडे यांनी दिली.

या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, जीएनएम, डी.फार्म, एम.एस.डब्लू.बी.सी.एस.बी.सी.ए या शैक्षणिक पात्रतेची

 एकूण 2 हजार 697 पेक्षा जास्त रिक्तपदे सोलापूर आणि पुणे येथील उद्योजकांनी अधिसुचीत केलेली आहेत. मेळाव्यात सोलापूर औद्योगिक परिसरातील 16 नामांकिमत उद्योजक सहभागी होणार आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रासह बुधवार, दिनांक 31 जुलै 2024 रोजी ठीक 10.00  वाजता  रयत शिक्षण संस्थचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर ता.पंढरपूर जि.सोलापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. 

याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2992956 या दुरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधवा,

 असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे प्र. सहायक आयुक्त हनमंत नलावडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments