google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकाच दिवसी सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

Breaking News

मोठी बातमी..शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकाच दिवसी सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

मोठी बातमी..शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकाच दिवसी सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी पार पडली. यात सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांसह त्यांच्या ४१ आमदारांना नोटीस जारी केली. 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण या दोन्ही महत्त्वाच्या प्रकरणांवर यापुढे एकाच दिवशी सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ३ सप्टेंबरला होण्याची शक्यता असून त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचीही सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दोन्ही बाजूंचे आमदार पात्र ठेवले होते. 

त्यांच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात तर शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

 त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणातही विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही बाजूच्या आमदारांना पात्र ठेवले होते. याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

४१ आमदारांना नोटीस

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर अजित पवारांसह त्यांच्या ४१ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली.

 यानंतर एकाच दिवशी या दोन्ही प्रकरणांची सुनावणी होणार आहे. दोन्ही सुनावण्या एकाच दिवशी होणार असल्या तरी एकत्र होणार नाहीत, स्वतंत्रपणे होणार आहेत.

Post a Comment

0 Comments