धक्कादायक; साखरपुडा मोडल्यामुळे हैवानाने घरात घुसून कापले मुलीचे शीर.
कर्नाटकातील एका गावात एका 16 वर्षीय मुलीची 32 वर्षीय व्यक्तीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल प्रकाश आणि मुलीचा साखरपुडा होणार होता, मात्र कोणीतरी याबाबत बाल आयोगाला माहिती दिली.
या प्रकरणाची माहिती मिळताच आयोगाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही कुटुंबीयांना सांगितले की, मुलगी अल्पवयीन आहे, त्यामुळे हा साखरपुडा होऊ शकत नाही.
यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी सहमती दर्शवत लग्न रद्द केले. सायंकाळी पाचच्या सुमारास प्रकाश याने मुलीच्या घरात घुसून मुलीच्या पालकांवर हल्ला केला. आणि मुलीला घराबाहेर ओढून तिचा शिरच्छेद करून तिची हत्या केली.
आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कालच मुलीचा दहावीचा निकाल आला आणि ती पास झाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
त्यानेच तिची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. साखरपुड्यानंतर आरोपी तरुण तिच्या घरी आला आणि तिला घरातून ओढत नेलं.
एका मंदिराजवळ तिचं शीर धडावेगळं करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास केला जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोडागु इथल्या युएस मीना नावाची मुलगी सुरलब्बी इथल्या हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होती.
नुकताच दहावीचा निकाल लागला असून यात ती उत्तीर्णसुद्धा झाली आहे. दरम्यान, निकालानंतर तिचं लग्न तिच्या वयापेक्षा दुप्पट वय असणाऱ्या
ओंकारप्पा नावाच्या तरुणासोबत ठरवण्यात आलं. त्यानेच तिची निर्घृण हत्या केली. हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
कोडागू जिल्ह्यातल्या दुर्गम अशा गावातली ती सरकारी शाळेत शिकणारी शिकणारी एकमेव एसएसएलसी विद्यार्थीनी होती. गुरुवारी तिचा साखरपुडाही करण्यात आला होता.
त्यानंतर होणारा पती ओंकरप्पा सायंकाळी चार वाजता पुन्हा तिच्या घरी आला. तिला घराजवळच फिरायला घेऊन गेला. त्यानंतर एका मंदिराजवळ तिचं शीर धडावगळं केलं.
तिच्या आई वडिलांसमोरच ही हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. युएस मीना ही सुब्रमणी आणि मुथक्की यांची एकुलती एक मुलगी होती.
0 Comments