google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! भाजपची मोठी घोषणा मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

Breaking News

ब्रेकिंग! भाजपची मोठी घोषणा मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 ब्रेकिंग! भाजपची मोठी घोषणा मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा


देशातील लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी तीन टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. दरम्यान आता भाजपच्या प्रचारात मुस्लिमांचा मुद्दा प्रखरतेने येत असल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द करुन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवू, 

असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. तेलंगणातील प्रचार सभेत बोलताना शहा यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर हल्ला चढवला. 

काँग्रेस पक्ष खोटे दावे करुन लोकसभा निवडणूक लढवत आहे. मोदी पुन्हा सत्तेत आले तर ते आरक्षण संपवून टाकतील, असे काँग्रेस पक्ष सांगतो. गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी यांनी देशावर निर्विवादपणे राज्य केले आहे. 

पण त्यांनी आरक्षण संपवले नाही. याउलट काँग्रेस पक्षाने एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे आरक्षण लुटून मुस्लिमांना चार टक्के आरक्षण दिले, असे शहा यांनी म्हटले. 

भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसने याठिकाणी मुस्लिमांना जे आरक्षण दिले आहे, ते रद्द करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. हे आरक्षण आम्ही एससी, एसटी आणि ओबीसींना देऊ, असेही शहा यांनी म्हटले.

Post a Comment

0 Comments