महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांमध्ये धो-धो पाऊस बरसणार, भर उन्हाळ्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट
ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पुण्यातील कात्रज, स्वारगेट आणि कोंढवा या भागात पाऊस सुरु आहे.
तर सांगलीच्या वळवा तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे.
गारपिटीमुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अहमदनगर आणि पारनेर या ठिकाणी देखील पाऊस पडला आहे.
याशिवाय पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो, याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात 12 मे या तारखेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी देखील
12 तारेखासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह
वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या वेळी वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रतितास असा असण्याची शक्यता आहे.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील काही भागांना वादळी वारा आणि गारपिटासह पावसाने झोडपले आहे.
सांगलीच्या वाळवा तालुक्यात आज सकाळपासूनच उन्हाचा पारा चाळीसच्यावर गेलेला होता. दुपारपासून आभाळ आले होते.
विजांचा कडकडाट, वादळासह 20 मिनिटे गारांचा अवकाळी पाऊस झाला. गारपिटीमुळे या परिसरातील आंब्याचे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. या परिसरातील विहिरी कुपनलिका यांनी तळ गाठला होता.
आज झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा आल्याने बळीराजा सुखावला आहे. पण बळीराजाला मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे मशागत करता येणार नाही.
0 Comments