खळबळजनक ...मोटर सायकलच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी मागितली पन्नास हजारांची लाच;पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचा कर्मचारी सापडला रंगेहाथ
पंढरपूर : मोटार सायकलच्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न दाखवण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस नाईक यांनी एक लाखाची लाच मागून
तडजोडीने 50 हजार रुपये स्वीकारल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वैजिनाथ संदिपान कुंभार, वय ५२ वर्षे, पद पोलीस नाईक, ब.नं. ३८०, नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण
रा. अर्थव बिल्डींग, ब्लॉक नं. २०७, पुजारी सिटी, इसबावी पंढरपूर ता. पंढरपूर, जि. सोलापूर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गु.र.नं. ४४/२०२४, भा. द.वि. संहिता १८६० चे कलम २७९, ३३७, ३३८ व मोटार वाहन अधिनिय १९८८ चे कलम १३४
(ए), १३४ (बी) १७७, १८४ प्रमाणे अज्ञात वाहनाविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयात तक्रारदार यांची मोटार सायकल न दाखविण्यासाठी तसेच
सदर गुन्हयात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासठी यातील लोकसेवक वैजिनाथ संदिपान कुंभार, यांनी तक्रारदार यांचेकडे १,००,००० रुपये लाचेची मागणी करुन
तडजोडी अंति ५०,००० रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करुन सदरची लाच रक्कम स्वतः स्विकारले वरुन रंगेहात पकडण्यात आले आहे.
सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर. पोलीस अंमलदार पोहेकॉ अतुल घाडगे,
पोहेकों सलीम मुल्ला, पोना स्वामीराव जाधव, चापोकों शाम सुरवसे, सर्व नेम. ला.प्र.वि., सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
0 Comments