रमेश कदमांना येणाऱ्या काळात मंत्री करणारचं : तानाजी सावंत
राजकीय निर्णय भावनिक होऊन नाही तर वास्तववादी होऊन घ्याव्या लागतात विकासासाठी लोकसभेत नरेंद्र मोदींना पाठिंबा रमेश कदम
मोहोळ २०१४ साली मोहोळ : विधानसभा मतदारसंघात केवळ दहा महिने च आमदार म्हणून काम केले.
त्या काळात मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता ही संकल्पना स्वखर्चाने राबविली. आणि अनेक गावांचे अनेक वर्षे प्रलंबित असणारे प्रश्नक सोडविले.
तद्नंतर २०१९ च्या निवडणुकीत जेलमधून केवळ उमेदवारी अर्ज भरला. प्रचाराला न्यायालयाने परवानगी दिली नाही. तरीसुध्दा मोहोळ च्या २५ हजार जनतेने मला म तदान केले.
आज ही आलेली जनता केवळ माझ्या प्रेमापोटी आली आहे. मी केवळ दहा महिन्यात कमविलेला विश्वास आज दहा वर्षे झाली तरीही टिकून आहे. तुमच्या विश्वासला कुठेही तडा जाऊ देणार नाही.
पण राजकारण अथवा समाजकारण करीतअसताना भावनिक होऊन चालत नाही. तर वास्तवादी राहावं लागते. अशी घोषणा मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी जाहीर सभेत
राज्याचे आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीतकेली. लोकसभेला मला मांडायची आहे.' माझी भूमिका या मथळ्याखाली माजी आमदार रमेश कदम यांनी सभेचे आयोजन
मोहोळ कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मैदानावर केले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. पुढे म्हणाले की, मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा, शिरापूर उपसा, पंढरपूर तालुक्यातील रस्त्याचे प्रश्रक, उत्तर
सोलापूर तालुक्यातील अनेक समस्याह्या सोडवायच्या असतील तर सत्तेतील लोकांच्या मदतीची गरज आहे. राजकारणात केवळ भावनिक होऊन चालत नाही.
विकासासाठी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू या. मी तुम्ही ठेवलेल्या विश्वासला कधीही तडा जाऊ देणार नाही. असे आवाहन यावेळी माजी आमदार रमेश कदम यांनी केले.
चौकट -
ह्या प्रस्थापितांनी गावगाड्यातील तरुणांना नेहमीच वंचित ठेवले आहे. त्यांचा वापर फक्त मता पुरताच करून घेतला आहे. ही चालेलेली प्रस्थापितांची पद्धत आपणाला बंद पाडायची आहे. कोण मालक नाही.
- आरे ला कारे.. ठोक्याला ठोका अशी माझी पद्धत आहे. आणि रमेश कदमांची सुद्धा त्यामुळे रस्त्यावर उतरणारा, माणसाला हातात हात देणारा, गरीबाच्या कुटुंबातील लोकांना भाकरी देणारा, गरीब,
उपेक्षित वंचितांचे दुःख जानणारा, गावगाड्यातील नागरिकांच्या समस्या सोडविणारे रमेश कदम यांनी केवळ दहा महिने केलेल्या कामाची पोहच पावती आज या जनतेने दिली आहे.
त्यामुळे रमेश कदमांची जागा तुमच्या मनात जशी आहे. त्या ठिकाणी नेऊन ठेवणार, २०२४ ला माझे मित्र रमेश कदम यांना मंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही......... ना. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री
0 Comments