43 माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर
यांच्या, प्रचारार्थ सांगोला शहरात होम टू होम प्रचार संपन्न
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, मणेरी गल्ली, परीट गल्ली, भाजी मंडई परिसर ,कुंभार गल्ली, मेन रोड ठिकाणी प्रचार दौरा
सांगोला /प्रतिनिधी: 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,आरपीआय (आठवले गट) ,रासप, रयत क्रांती संघटना या पक्षांच्या महायुतीचे उमेदवार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या ,
प्रचारार्थ सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर , मणेरी गल्ली, परीट गल्ली, भाजी मंडई परिसर, कुंभार, गल्ली मेन रोड या ठिकाणी महायुतीचे,
पदाधिकारी कार्यकर्ते यांनी होम टू होम प्रचार करीत खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला .
माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी मतदारांनी
कमळ चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्यांनी विजयी करावे असे आवाहन महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून मतदारांना करण्यात आले.
सांगोला तालुक्यातील सिंचनाच्या योजना खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात मार्गी लागल्या .
तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
तालुक्यातील शेती सिंचनाच्या अनेक योजना पूर्णत्वास येत आहेत भविष्यात उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च
एकदा सेवा करण्याची संधी देण्यासाठी त्यांना मोठ्या मताधिकेने विजयी करा असे आवाहन महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांगोला शहरातील प्रचारा दरम्यान केले .
सांगोला शहरातील या प्रचार दौऱ्यामध्ये माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने ,गटनेते तथा नगरसेवक आनंदाभाऊ माने, नगरसेविका छायाताई मेटकरी,
उद्योगपती आनंद घोंगडे, नगरसेवक माऊली तेली, चेअरमन लता मोटे, संग्रामसिंह जाधवराव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाघ, सूर्यकांत मेटकरी ,आयुब जमादार,
मायाका प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे, सुनील पवार, जय बनसोडे, अशपाक मुलाणी, शिवाजी गावडे, प्रमोद जाधव, ऋषी जानकर, भाजपचे, मानस कमलापूरकर, काशलिंग गाडेकर, भारत माळी,
प्रवीण जानकर, हरिदास कारंडे ,किशोर शेंडगे, किरण ढवळे, सुमित कोल्हे, राहुल दिवटे, सागर पवार ,निलेश भोसले ,मोहन घाडगे ,वसंत चंदनशिवे, रेश्मा मुजावर,
अनुराधा माने, सुवर्णा जाधव ,अश्विनी दोलतडे,सुवर्णा गडदे, करिश्मा मुजावर, ललिता खाडे , फर्जाना मुजावर, अरुणा माने, रुकसाना मुजावर, यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments