खळबळजनक ..मोहिते पाटील आता मैदानात सापडलेत, त्यांना सोडायचं नाही; शहाजीबापूंचा हल्लाबोल
मोहिते पाटील यांनी गेली ४० वर्षे ह्या शहाजीबापूला चिंध्या चिंध्या करून घरात बसवलं.
ते मोहिते पाटील आता मैदानात सापडले आहेत. त्यांना आता सोडायचं नाही. मोहिते आज सापडले आहेत, त्यांना सोडाल तर माझ्या रक्ताची शपथ आहे,
तुम्हाला.अजिबात सोडायचं नाही. सगळ्यांनी मिळून दणका द्यायचा, अशा शब्दांत आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सांगोला येथे देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.
त्या सभेत आमदार पाटील यांनी मोहिते पाटील आणि शरद पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, पाणी फक्त शिवसेना भाजपच्या लोकांना मिळणार आहे का. शेकापची लोकं पाणी घेणार नाहीत का.
फडणवीसांनी दिलेले पाणी आम्ही घेणार, आम्ही स्वाभिमानी आहोत, हे डॉ. अनिकेत आणि बाबासाहेब देशमुख यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांना सांगावं.
अकलूजमधील फडणवीसांच्या सभेला रणजितसिंह मोहिते पाटील जाणार का?
शेकापवाले सगळं आमच्याकडून घेतात आणि निवडणुकीत तुतारी म्हणतात. शरद पवारांनी भल्याभल्यांना एकटं सोडलं. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले.
आमच्या सांगोल्याचा वनवास एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संपवला. त्यामुळे सुखानं सगळं चाललं आहे, तुम्ही काही बिघडू नका, असे आवाहन शहाजीबापू पाटील यांनी केले.
मोहिते पाटील यांचे दोन्ही कारखाने कर्जात गेले होते. देवेंद्र फडणवीस यांनी वाचवले. त्यांनी मदत केली नसती,
तर ते आपल्याच बॅंकेकडे कर्ज मागायला येत होते. फडणवीसांनी मोहिते पाटील यांनी खुराक दिला, आता उठून बसल्यावर फडणवीसांविरोधात दंड थोपटत आहेत.
मोहिते पाटील जिकडं गेलेत, तिकडं सगळं त्यांनी मोडीत काढलं आहे. डीसीसी बॅंकेचे एका घराने १३०० कोटींचे कर्ज घेतले आणि बुडवून टाकले.
त्यामुळे आज जिल्हा बॅंकेचे कर्ज सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळत नाही. जिल्हा दूध संघही त्यांनी बंद पाडला, असा आरोप शहाजी पाटील यांनी केला.
ते म्हणाले, सांगोला तालुक्याला भाजप आणि शिवसेनेने दिले आहे. मोहिते पाटील यांनी सांगोला तालुका वाळवंट करून उद्ध्वस्त केला होता.
दीपक साळुंखे यांच्या सहकार्याने मी आमदार झालो. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगोल्याला पाणी दिले. पाच कारखान्यांना पुरेल एवढा ऊस या सांगोला तालुक्यात नाही
लावला तर राजाराम पाटील हे बापाचे नाव मी लावणार नाही. कुठल्याही गावांत तुम्हाला ऊस, डाळिंब, सीताफळांचे मळे दिसतील.
गुवाहाटीला गेलो म्हणून पाच हजार कोटींचा निधी मिळाला
मी गुवाहाटीला कशाला गेलो होता, हे बाकीच्यांना माहिती नसेल पण तुम्हाला माहिती आहे.
शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली असली तरी भाजप आणि सांगोला राष्ट्रवादीची मला गेल्या निवडणुकीवेळी मदत झाली हेाती. एवढं करूनही आम्ही घासून जिंकलो.
आमची लढाई गणपराव देशमुख यांच्याशी नव्हती. त्यांना पराभूत करायचं असं आमचं म्हणणं नव्हतं. पण आमच्या सांगोल्याला पाणी आणायचं होतं.
गुवाहाटीला गेलो म्हणून सांगोल्याला पाच हजार कोटींचा निधी आला. गद्दारी आम्ही केली नाही. उद्धव ठाकरे हे तर निवडूनही आले नव्हते. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे आमच्या मनात खंत होती.
शरद पवारांवर आम्ही प्रमाणिक श्रद्धा ठेवली, त्यांनी आम्हाला काय दिले. पवारांनी सांगितलेला एक शब्द खरा झाला तर मी राजकारण सोडेन.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या घरात महादेव आणून सोडला, तर तीन तासांत राक्षस होऊन वर जाईल, असे ते आहात. माझ्या नादाला लागायच्या भानगडीत पुन्हा पडू नका.
आम्ही जीभ आवळून धरली आहे. जर मोहिते पाटील पुन्हा निवडून आले तर सांगोला तालुक्याने पाणी त विसरावे. रणजितसिंह निंबाळकर खासदार झाले तर एक एकर तुमचं कोरडं ठेवणार नाही.
मोहिते पाटील डोक्यातून निघेनात
बोलण्याच्या ओघात शहाजी पाटील हे रणजितसिंह मोहिते पाटील यांना निवडून द्यायचं आहे, असे बोलून गेलं. व्यासपीठावरील लोकांनी त्यांना निंबाळकर अशी आठवण करून देताच
मोहिते ४० वर्षे माझ्या मागं लागलेत, डोक्यातूनच निघेनात. तिच्या..... दमवून टाकत आहेत मोहिते....' अशी टीका त्यांनी मोहिते पाटील यांच्यावर केली.
0 Comments