सांगोला शहरात अखेर प्रलंबित भुयारी गटार योजनेचे काम सुरू काम वेळेत पूर्ण करण्याची नागरिकांची अपेक्षा; भरीव निधीची तरतूद
सांगोला : (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
अखेर मुहूर्त मिळालाच, पहिल्या टप्प्यातील महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजना प्रकल्पाच्या सांगोला वंदे मातरम् चौक ते क्रीडा संकुल, माळवाडी रेल्वे पुलापर्यंत
बायपास रस्त्याच्या खालून (डीडब्ल्यूसी) पाईपलाईन टाकणे व चेंबर बांधणे कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. यामुळे सांगोलाकरांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
अखेर उशिरा का होईना, सांगोल्यातील रस्ते दुरुस्त होतील, अशी अपेक्षा लागून आहे. यावरुन आता तरी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार का, असा सवाल पालिका प्रशासनाला नागरिक विचारत आहेत.
भुयारी गटारी योजनेच्या नावाखाली सांगोल्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. शहर विकासापासून कोसो दूर आहे.
नागरिकांना मूलभूत गरजा पुरविण्यामध्ये पालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
सांगोला वंदे मातरम् चौक, क्रीडा संकुलाच्या शेजारुन माळवाडी रेल्वे पुलापर्यंत बायपास रोड खालून पाईपलाईन टाकणे व ठिकठिकाणी चेंबर बांधण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
या कामाची मुदत दोन वर्षेकरावी लागणार आहे. शहराच्या विकासाला नेमकी गती कधी मिळणार, असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
0 Comments