सांगोला येथे विनापरवाना कोळसा वाहतूक करणाऱ्या आयशरवर कारवाई; ३६० पोती कोळसा माल जप्त
सांगोला (प्रतिनिधी):-(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
वनपरिक्षेत्र सांगोलामध्ये दिवसा फिरती करत असताना सांगोला नियतक्षेत्रात वाढेगाव ते पुणे रस्त्यावर सदर वाहनाची तपासणी केली.
यामध्ये अवैध वाहतूक कोळसा पोती ३६० मिळून आली. सदर आयसर काळ्या ताडपत्रीने बांधून वाहतूक करित होता.
वाहन चालक श्री. आप्पासो काकडे यांना वनपाल सांगोला यांनी कोळसा वाहतूक पास परवाना विचारला असता कोळसा वाहतूक करणेसाठी माझ्याकडे वनविभागाचा वाहतूक पास नाही असे सांगितले.
सदर कोळसा पोती ३६० वाढेगाव येथून पुणे येथे अवैध वाहतूक होत असल्यामुळे आयसरमधील कोळसा पोती ३६० सह वाहन जप्त केले.
वाहन चालक श्री. आप्पासो काकडे यांनी सांगितले कि, सदर कोळसा पोती ३६० ही सचिन बंडगर रा. अनकढाळकोळसा व्यापारी यांची आहेत.
मी वाहतूक भाडे करित होतो.अवैध कोळसा पोती ३६० त्याचे वजन ९००० कि. ग्रॉ.आहे.
तसेच ३६० कोळसा पोती बाजारभावप्रमाणे अंदाजे किंमत दोन लाख रु. होईल. सदरचा कोळसा हा मालकी क्षेत्रातील आहे. वाढेगाव येथे वनविभागाचे वनक्षेत्र नाही.
पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम जाधवर करत आहेत.वृक्षतोडीसाठी वृक्षतोड परवाना घेणे, वाहतूक करणेसाठी वनविभागाचा वाहतूक पास घेणे व कोळसा वाहतूक करणेसाठी
वनविभागाचा वाहतूक पास घेणे आवश्यक आहे. वृक्षतोड परवाना नसेल व वाहतूक पास नसेल तर कारवाई केली जाईल असे आवाहन लोकांना वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम जाधवर यांनी केले आहे.
सदर अवैध कोळसा वाहतूक कारवाई मुख्यवनसंरक्षक पुणे श्री. एन. आर. प्रविण, उपनवसंरक्षक सोलापूर श्री. धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक श्री.बी.जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर,वनपाल सांगोला श्री.एस.एल.मुंढे, वनरक्षक कटफळ श्री.आर.व्ही. कवठाळे व हंगामी वाहन चालक श्री. संकेत बाबर यांनी केली आहे.
0 Comments