google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 टेंभूचे पाणी माण नदीत सोडले मतदार शेतकऱ्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचे आभार मानले

Breaking News

टेंभूचे पाणी माण नदीत सोडले मतदार शेतकऱ्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचे आभार मानले

टेंभूचे पाणी माण नदीत सोडले मतदार शेतकऱ्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचे आभार मानले 


टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे सांगोल्यासाठी आवर्तन सुरू करण्यात आले असून, टेंभूच्या पाण्याने आटपाडी तलाव भरल्यानंतर आता माण नदीत ते पाणी सोडले आहे.

 त्यामुळे ऐन उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीत सांगोल्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सांगोला तालुक्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जनतेला दिलासा देण्यासाठी आमदार शहाजी पाटील यांनी टेंभू योजनेतून आवर्तन सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला होता.

 टेंभू योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, उपअभियंता गायकवाड, शाखा अभियंता महेश पाटील यांची बैठक घेण्यात आली.

आमदार शहाजी पाटील यांनी टेंभू योजनेतून लाभक्षेत्रातील जुनोनी, हातीद, पाचेगांव जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव,

 बंधारे पूर्ण क्षमतेने भरून टेंभूचे माण नदीमध्ये पाणी सोडून खवासपूर ते मेथवडे पर्यंतचेसर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना टेंभूच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

कोणत्याही गावाला पाणी कमी पडू नये, याची दक्षता घेण्याच्याही सूचना आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

ऐन उन्हाळ्यात टेंभूचे पाणी मिळाल्याने पिण्याचा पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याने माणनदी

 नदीकाठावरील सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्याचा जनावरांचा चारा, घास, कडवळ, मका या पिकांना सर्वाधिक लाभ मिळणार आहे.

विजय बाबर, सदस्य, पाणी संघर्ष समिती, सांगोलाटेंभूचे पाणी माण नदीत आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 सांगोल्यातील शेतकऱ्यांना ऐन टंचाईच्या काळात पाणी मिळाल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहेच आणि चाऱ्याचाही प्रश्न सुटणार आहे.

Post a Comment

0 Comments