मोठी बातमी...माढ्यात आघाडीच्या नेत्याचं वाढलं टेन्शन; डॉ. अनिकेत देशमुख अपक्ष लढणार
माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घोडामोडींना वेग आला आहे. शेतकरी कामगार पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख उद्या (शुक्रवारी) माढ्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
देशमुख यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टेन्शन वाढलं आहे. 2019 च्या सांगोला विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. अनिकेत अवघ्या 700 मतांनी पराभूत झाले होते.
माढा लोकसभेसाठी देशमुखांनी आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली होती. डॉ. अनिकेत देशमुख हे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत.
माढा लोकसभेत काही दिवसांपासून ज्या घडामोडी सुरु आहेत, त्यावर सांगोल्यातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. येथील लोकांना राजकीय लोक गृहीत धरुन आबासाहेबांच्या नावाने साधारण एक लाख मते मिळणार
अशी अपेक्षा करीत असतात. त्याचा येथील नागरिकांमध्ये रोष आहे. महाविकास आघाडीने जे केले ते दिशाहीन असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
आपल्यावर अन्याय झाल्याची भावना मतदारांमध्ये आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, असा निर्णय आजच्या बैठकीत घेतला, असे अनिकेत देशमुख यांनी सांगितले.
'भाजपमधून उमेदवार आयात करुन याठिकाणी उमेदवारी द्यावी लागत आहे, त्यामुळे आमच्यावर अन्याय झाल्याने आम्हीही भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीत जे निष्ठेने काम करतात,
त्या व्यक्तीवर अन्याय झाला, अशी भावना त्यांची आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही ही भूमिका घेत आहोत., पक्षबदलणाऱ्या लोकांना जनता कंटाळली आहे.
त्यांना पर्याय म्हणून आम्ही निवडणूक लढविणार आहोत, आज सांयकाळपर्यंत आम्ही पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवारांसाठी आता मनसे ॲक्शन मोडवर आली आहे.
माढा मतदार संघात रणजीतसिंह निंबाळकर आणि सोलापुरात राम सातपुते यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात सात सभा मनसे घेणार आहे.
याशिवाय मनसेची स्वतंत्र प्रचार यंत्रणा देखील या निवडणुकीमध्ये भाजपसाठी काम करताना पाहायला मिळेल.
याबाबत नुकतीच मनसेच्या पदाधिकारी यांची बैठक पंढरपूर येथे झाली. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोलापुरसह सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments