google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ...दुचाकी वापरल्याने वडील रागावले, शाळकरी मुलाने उचललं टोकाचं पाऊल

Breaking News

खळबळजनक ...दुचाकी वापरल्याने वडील रागावले, शाळकरी मुलाने उचललं टोकाचं पाऊल

खळबळजनक ...दुचाकी वापरल्याने वडील रागावले, शाळकरी मुलाने उचललं टोकाचं पाऊल


दुचाकी वापरण्याच्या कारणावरुन वडील रागावल्याने शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उरळी कांचन भागात घडली

श्रीराज संतोष सोनावणे (वय-16 रा. दत्तवाडी, उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. श्रीराजने नुकतीच नववीची परीक्षा दिली असून तो सध्या दहावीचे शिक्षण घेत होता.

याबाबत सतीश साहेबराव सोनावणे (वय-51) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.16) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी वापरण्याच्या कारणावरून वडिलांनी श्रीराज याला रागावले होते.

वडील रागवल्याच्या कारणावरुन श्रीराज याने पत्रा शेड मधील अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार श्रीराजच्या आईला दिसताच त्यांनी सतीश यांना फोन करुन सांगितले.

त्याला तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

श्रीराज याचे आई-वडील व बहिण असे परिवार आहे. वडील शिवाजीनगर येथील एका खासगी बँकेत नोकरीला आहेत.

Post a Comment

0 Comments