काय सांगता ! लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरुन एन्ट्री;
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे काय सांगता ! लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरुन एन्ट्री;
माढ्यातील उमेदवाराची जिल्ह्यात चर्चा हे लोकसभा निवडणुकीत अनेक जण आपले नशीब आजमावत आहेत.
लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे जाहीरनामे, भाषणे, मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या हटके आश्वासनांची चर्चा होत असते.
अशातच माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक उमेदवार चक्क रेड्यावर बसून आल्याचे पाहायला मिळाले. या एन्ट्रीची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
"देशामध्ये बोकाळलेला भ्रष्ट्राचार संपला पाहिजे. ओबीसीतून मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
देशात फक्त स्वार्थासाठी राजकारण सुरू आहे. सामान्यांना नेते घाबरत नाहीत.
त्यामुळे आता शेवटचे टोक म्हणजे यमाला घाबरतील म्हणून अशा रुपात आलो आहे," अशी प्रतिक्रिया यावेळी राम शिंदे यांनी म्हटले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माढा लोकसभेची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रेड्यावर बसून एक उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला.
उमेदवाराच्या या हटके एन्ट्रीने सर्वच चकित झाल्याचे पाहायला मिळाले.
यमाचा पोशाख आणि रेड्यावर बसून केलेल्या या एन्ट्रीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
राम गायकवाड असे या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. राम गायकवाड हे मूळचे पंढरपुरचे असून माढ्यातून ते लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत.
ओबीसी प्रवर्गातून टिकणारे मराठा आरक्षण मिळावे हा मुद्दा घेऊन राम गायकवाड हे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
0 Comments