मोठी बातमी..माढ्यात तिढ्यावर तिढे! शरद पवारांनी एका रात्रीत सूत्रे फिरवली,
अनिकेत देशमुखांचं बंड थंड, धैर्यशील पाटलांच्या मागे ताकदीने उभे राहणार
शरद पवार यांच्या सूचनेनंतर गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचे बंड थंडावले आहे.
शरद पवार यांनी तातडीने डॉ. देशमुख यांना तातडीने बारामती येथे बोलावून घेतले होते .
रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी समजूत घातल्यावर अनिकेत यांचे बंड थंड झाले आहे . डॉ. अनिकेत देशमुख यांनी माघार घेत महविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे उभे राहण्याची घोषणा केली आहे.
रात्रीत शरद पवार यांनी डॉ. अनिकेत देशमुख यांचे बंड थंड केले आता उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत.
पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ यंदा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. राज्याच्या राजकरणात माढा आणि तिढा जणू काय नवीन समीकरणच बनले आहे.
माढ्यातील तिढे काही संपण्याचे नाव घेत आहे. एक तिढा सुटत नाही तर दुसरा तिढा समोर येतो. अखेर शरद पवारांना एक तिढा सोडवण्यात यश आळे आहे.
अनिकेत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी कामगार पक्षाचे या माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांची उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
काल रात्री उशिरापर्यंत शरद पवार यांनी डॉ देशमुख यांची भूमिका समजावून घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले . यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील देखील उपस्थित होते .
यानंतर आज सकाळी ABP माझाशी बोलताना डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपल्या मनातील सामाजिक आणि राजकीय अडचणी पवार याना सांगितल्यावर त्यांनी मदतीचे आश्वासन दिल्याचे सांगितले .
यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनीही सांगोल्यासाठी पुढील पाच वर्षात काय करणार आणि काय करायला पाहिजे याबाबत डॉ देशमुख यांच्याशी चर्चा केली .
या बैठकीत समाधान झाल्याने आज सकाळी आपण उमेदवारी अर्ज भरणार नसून आता महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याचे डॉ अनिकेत देशमुख यांनी माझाशी बोलताना सांगितले .
0 Comments