सोलापूर तापले! आज सर्वाधिक तापमानाची नोंद; पारा ४४ अंश सेल्सिअसवर
उन्हाच्या उकाड्याने नागरिकांना कुलर, पंखे, एससीच्या हवेत राहण्याची वेळ आली आहे. मंगळवारी (ता. ३०)
सोलापूर जिल्ह्याचे तापमान उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.सोलापूर : सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत
असून उकाड्याने प्रत्येकजण त्रस्त असल्याची स्थिती आहे. पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्यांची तर पंचाईतच झाली आहे. शेतात पाणी नसल्याने झाडे जवळून गेली आहेत.
उन्हाच्या उकाड्याने नागरिकांना कुलर, पंखे, एससीच्या हवेत राहण्याची वेळ आली आहे. मंगळवारी (ता. ३०) सोलापूर जिल्ह्याचे तापमान उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही दिवस तापमानाचा पारा वाढलेलाच दिसणार आहे. दुष्काळामुळे जमिनीची पाणीपातळी खालावली असून नदी,
तलाव, ओढे, मध्यम व लघू प्रकल्प कोरडे पडले असून काहींनी तळ गाठला आहे. या पार्श्वभूमीवर झाडांनीही माना टाकल्या आहेत.
आता एप्रिलअखेर सोलापूर जिल्ह्याचे तापमान उच्चांकी ४४ अंशावर गेले आहे. आता अजून संपूर्ण मे महिन्यात काय स्थिती राहील, या अंदाजानेच अनेकांची चिंता वाढली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आणि त्यानंतर उष्णता वाढली. चार दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान सरासरी ४३ अंश सेल्सिअसच्या खाली आलेले नाही.
नागरिकांनी काळजी घ्यावी...
- उन्हाच्या तडाख्यात शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे
- कामानिमित्त उन्हात बाहेर गेल्यानंतर अंगात सुती कपडे असावीत
- डोळ्यावर गॉगल तथा चष्मा, डोक्यावर टोपी असावी
- सोबत पिण्याच्या पाण्याची बाटली ठेवा, थंड पाणी पिणे टाळा
0 Comments