ब्रेकिंग न्यूज! निवडणूक खर्चात तफावत; आ.प्रणिती शिंदे,
आ.राम सातपुते यांना नोटीस; निवडणूक संनियंत्रण पथकाकडून तपासणी
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४, निवडणूक खर्च संनियंत्रण यांवरील अनुदेशांचा सारसंग्रह जानेवारी २०२४ अन्वये
सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची खर्चाच्या नोंदवह्या तपासणीत ‘इंडिया आघाडी’च्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे,
‘महायुती’चे उमेदवार आ.राम सातपुते यांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चात तफावत दिसून आल्याने दोन्ही उमेदवारांना नोटीस बजाविण्यात आले.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार निवडणूक संनियंत्रण पथकाकडून खर्च निरीक्षक उमेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सात रस्ता परिसरातील
शासकीय विश्रामगृह येथे ३० एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ यावेळेत उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या
तपशीलाची तपासणी करण्यात आली. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार उपस्थित होते.
या तपासणीत आ.प्रणिती शिंदे व आ.राम सातपुते या दोन उमेदवारांच्या निवडणूक खर्चात तफावत दिसून येत असल्याने
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या स्वाक्षरीने त्यांना या फरकाबाबत खुलासा करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत.
खर्चाच्या तपासणीवेळी नोडल अधिकारी खर्च संनियंत्रण, सर्व सहाय्यक खर्च निरिक्षक, खर्च संनियंत्रण पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments