google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...तोंडातून फेस, रस्त्यातच कोसळला.. महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी; घराबाहेर पडताना काळजी घ्या !

Breaking News

खळबळजनक...तोंडातून फेस, रस्त्यातच कोसळला.. महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी; घराबाहेर पडताना काळजी घ्या !

खळबळजनक...तोंडातून फेस, रस्त्यातच कोसळला..


महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी; घराबाहेर पडताना काळजी घ्या !

 राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उकाड्यातही वाढ होताना दिसत आहे. वाढत्या तापमानाचा फटका विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागाला बसताना दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान 39 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. 

या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात पहिला उष्माघाताचा बळी गेला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये राहणाऱ्या गणेश कुलकर्णी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कुलकर्णी (30) हा तरुण पैठण तालुक्यातील बिडकीन याठिकाणी एका खासगी कंपनीत कामाला होता. तो जैनपूर मार्गाने बिडकीनकडे जात असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो रस्त्यावर कोसळला. 

यावेळी त्याच्या तोंडातून फेस आला. त्यामुळे त्याला तातडीने बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मात्रे यांनी गणेशला तपासून मृत घोषित केले. तसेच गणेशचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली.

राज्यात उष्णतेची लाट –

राज्यातील सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

 विदर्भात मंगळवारपासून (एप्रिल) काही ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य भारतात कोरडे वातावरण निर्माण झाल्याने राज्यातील तापमान वाढणार आहे. त्यामुळे विदर्भातील कमाल तापमान 42 अंश सेल्सियस पार पोहचण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments