google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ..लग्नाचा बस्ता घेऊन घरी परतताना भीषण अपघात

Breaking News

धक्कादायक ..लग्नाचा बस्ता घेऊन घरी परतताना भीषण अपघात

धक्कादायक ..लग्नाचा बस्ता घेऊन घरी परतताना भीषण अपघात


राज्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. दरम्यान बीडमध्ये अंबाजोगाई लातूर महामार्गावर एसटी बस आणि बाईकचा भीषण अपघात झाला आहे. 

यात तिघांचा जागीत मृत्यू झाला आहे. लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाची असा तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. 

सेवालाल पंडित राठोड (वय 21 वर्ष), बहीण दिपाली सुनील जाधव (वय 20) आणि भाची त्रिशा सुनील जाधव (वय एक वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सेवालालचे महिनाभरानंतर लग्न होते.

 त्यासाठी सर्वजण लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते. तिथून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या तरुणाच्या बाईकला एसटी बसने जोराची धडक दिली.

 या भीषण अपघातात भावी नवरदेव तरुणासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला. सेवालालचा येत्या 28 एप्रिल रोजी विवाह होणार होता. 

या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू होती. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल बीडच्या राडी तांडा येथे राहणाऱ्या बहीण दिपाली आणि एक वर्षाची 

भाची त्रिशा यांना घेऊन अंबाजोगाईला आला होता. लग्नाचा बस्ता बांधून बहीण आणि भाचीला घेऊन सेवालाल हा काल सायंकाळी बाईकवरून गावाकडे परत निघाला होता. 

दरम्यान वाघाळा पाटीजवळ समोरून येणाऱ्या लातूर-छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. अंबाजोगाई - लातूर महामार्गावरील बीडच्या वाघाळा पाटीजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघातात तिघांचा जागीत मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments