राज्यात कॉग्रेसमध्ये इनकमिंग…. माजी आमदाराचा समर्थकांसह पक्ष प्रवेश
आज टिळक भवन, मुंबई येथे सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने व
वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदिश माळी यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पत्रकार परिषदेस संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, मोदींची जुमलेबाजी व फेकुगिरी आता चालणार नाही,
आणि लोकसभा निवडणुकीत जनताच हे तानाशाही सरकार हद्दपार करेल असा विश्वास व्यक्त केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री, सुशीलकुमार शिंदे, अल्पसंख्याक विभागाचे
अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे आदी उपस्थित होते.
0 Comments