खळबळजनक...सांगोला तालुक्यात चोरट्यांनी पळविला घेरडी येथील शाळेतील टीव्ही
शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे
सांगोला (प्रतिनिधी):- अज्ञात चोरट्याने 40 हजार रुपये किंमतीचे शाळेच्या ऑफीसमधील साहीत्य पळवून नेले
असल्याची घटना 28 मार्च रोजी दुपारी 01 वाजलेपासून ते दि 29 मार्च 2024 रोजी सांयकाळी 06/30 वा. चे दरम्यान
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खताळ वस्ती घेरडी ता. सांगोला येथे घडली.चोरीची फिर्याद नागनाथ नवनाथ राजमाने (मुख्याध्यापक) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे. चोरट्यांनी 35 हजार
रू किमंतीचा एक एलजी कंपनीचा काळ्या रंगाचा 55 इंच लांबीचा स्मार्ट टि.व्ही व त्याचे सोबत एक्सटेन्शन बॉक्स,
अभ्यासक्रम भरलेला पेनड्राईव्ह असा एकूण 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे
शाळेची वेळ सकाळची आहे. दि. 28 मार्च रोजी सकाळी 07.30 वा. चे सुमारास फिर्यादी राजमाने शाळेत गेले होते. शाळेचे कामकाज झाल्यानंतर शाळा संपुर्णपणे बंद करून
दुपारी 1 वा. चे सुमारास ते घरी निघून गेले होते. त्यानंतर दि.29 मार्च 2024 रोजी गुड फ्रायडेची शाळेला सुट्टी असल्यामळे ते शाळेत गेलेशाळेला सुट्टी असल्यामुळे ते शाळेत गेले नव्हते.
सांयकाळी 06.30 वा. चे सुमारास फिर्यादी राजमाने हे घरी असताना खताळ वस्ती घेरडी येथे शाळेत मुलांना शालेय पोषण आहाराचा स्वंयपाक करण्यासाठी असणारी मावशी मालन मेटकरी यांनी फोन करून
ऑफीसचा दरवजा उघडा आहे व ऑफीसमधील टिव्ही चोरीला गेला आहे असे सांगितले. त्यानंतर लगेच मी व शाळेचे केंद्र अध्यक्ष अमोगसिध्द कोळी व इतर शिक्षक मायाप्पा गावडे,
वसंत बंडगर, भारत कुलकर्णी खताळ वस्ती घेरडी येथील शाळेत गेलो. तेथे गेल्यावर शाळा समितीचे अध्यक्ष सिंधू वगरे तसेच आश्रम शाळेचे आवताडे सर यांना बोलावून
घेवून सर्वांनी ऑफीस जवळ जावून पाहिले असता ऑफीसचा दरवजा उघडा होता. त्यानंतर सर्वजण ऑफीसमध्ये जावून पाहिले असता ऑफीसमधील भिंत्तीला लावलेला टिव्हीऑफिसमधील भिताला लावलेला टिव्ही
दिसला नाही त्यामुळे त्याचा आजूबाजूस शोध घेतला मिळून आला नाही त्यामुळे टिव्ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खात्री झाली.
0 Comments