डॉ.अनिकेत देशमुख यांचेकडून बागडे कुटुंबियांचे सांत्वन
बागडे कुटुबियांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी; तहसीलदार कणसे यांचेकडे मागणी
शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२
सांगोला (प्रतिनिधी):-पाचेगाव बुद्रुक येथील संगीता भारत बागडे यांचा वीज पडून मृत्यू झाला.
ही माहिती मिळताच शेकाप नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी पाचेगाव बुद्रुक येथे जाऊन बागडे कुटुंबियांचे सांत्वन भेट घेऊन घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
व बागडे कुटुंबियांना धीर देवून भविष्यात गरज लागेल तेव्हा मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी बागडे कुटुंबिय उपस्थित होते.
तालुक्यात सुसाट वाहणारे वादळी वारे व अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून, सांगोला तालुक्यात शनिवार दि.30 मार्च रोजी पाचेगाव बुद्रुक येथील संगीता भारत बागडे यांचा वीज पडून मृत्यू झाला होता.
काल रविवार दि. 31 मार्च रोजी स्व.भाई. गणपतराव देशमुख यांचे नातू व शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनीबागडे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.
बागडे कुटुबियांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी त्याचप्रमाणे पुढील मदतीसाठी सहकार्य करावे, अशी मागणी तहसीलदार संतोष कणसे यांचेकडे
डॉ. अनिकेत देशमुख यांनी थेट नातेवाईकांसमक्ष फोन द्वारे केली. त्याचप्रमाणे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही तहसीलदार कणसे यांचेकडे केली.
ही घटना अत्यंत दुर्दैवी असून वादळीवारा व विजांचा कडकडाट होत असल्यास शेतकऱ्यांनी सुरक्षित स्थळी थांबले पाहिजे
असे मत व्यक्त करत मयत संगीता भारत बागडे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देवू अशी ग्वाही डॉ. अनिकेत देशमुख यांनी यावेळी दिली.
0 Comments